Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर २७, २०२२

संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्व" ग्रंथास साहित्य विहार संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार



चंद्रपूर ( प्रतिनिधी) -  
    संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्व (जीवन कला) या चरित्रात्मक ग्रंथास नागपूरच्या साहित्य विहार संस्थेचा दत्तात्रय प्रभाकर जोशी स्मृती उत्कृष्ट संत चरित्र ग्रंथ‌ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. 
      ज्येष्ठ लेखक प्रा. रघुनाथ कडवे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या द्वारा निर्मित या ग्रंथात संत गाडगेबाबा यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांना अपेक्षित सामाजिक परिवर्तनाचा विचार आलेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण नागपूर येथे शंकर नगर चौकातील आयवा सभागृहात येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. वि. स. जोग यांच्या हस्ते प्रस्तुत पुरस्काराचे वितरण साहित्य विहार संस्थेद्वारे आयोजित साहित्य संमेलनात होणार आहे.देण्यात येणारा उत्कृष्ट संत चरित्र ग्रंथ पुरस्कार डॉ. अंजली पांडे द्वारा पुरस्कृत असून संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आशा पांडे यांनी दिली. संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्व (जीवन कला) या ग्रंथास यापुर्वी कोल्हापूरच्या संत गाडगेबाबा अध्यासन आणि करवीर साहित्य परिषदेचा विशेष संत ग्रंथ पुरस्कार मिळालेला आहे.प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशक पुणे येथील साई राजे प्रकाशन असून ग्रंथ विमोचन चंद्रपूरातील सुप्रसिद्ध डेबू सावली वृद्धाश्रमात संत गाडगेबाबा यांचे ९३ वर्षीय वाहनचालक भाऊराव काळे (मुंबई) यांच्या शुभ हस्ते झाले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.