Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर २०, २०२२

पोलिस अधीक्षक अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी

चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक म्हणून रवींद्र परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

20 ऑक्टोम्बरला महाराष्ट्र शासन गृह विभागाने तब्बल 24 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभाग,  कार्यरत उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना अद्यापही पदस्थापना दिली नाही. साळवे यांच्या पद स्थापणेचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

रवींद्रसिंह परदेशी हे काही वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात SDPO म्हणून रुजू झाले होते. २०१६ नागपूर येथे परिमंडळ क्रमांक दोनचे उपायुक्त असताना रवींद्र परदेशी राष्ट्रपती पोलिस पदक बहाल करण्यात आले होते. २०१७ मध्ये नागपूर येथे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी काम केले.   
मागील 2 वर्षापासून जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन अरविंद साळवे कार्यरत आहेत. यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्याचा उलगडा, गंभीर गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यास यश मिळाले होते. एकूणच पोलीस अधीक्षक साळवे यांचा कार्यकाळ समाधानकारक होता. 

खालील 
श्रीकृ्ष्ण कोकाटे : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड
सोमय विनायक मुंडे : अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली - पोलीस अधीक्षक- लातूर
सारंग डी आवाड : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा
गौरव सिंह : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ
संदीप घुगे : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई - पोलीस अधीक्षक, अकोला
रवींद्रसिंग एस. परदेशी : उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
नुरुल हसन : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा
निखील पिंगळे : पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया
निलोत्पल : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली
संजय ए बारकुंड : पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे
श्रीकांत परोपकारी : प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
सचिन अशोक पाटील : पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद
लक्ष्मीकांत पाटील : पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पराग शाम मणेरे : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई
धनंजय आर कुलकर्णी : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत - पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
पवन बनसोड : अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
बसवराज तेली : पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली
शेख समीर अस्लम : अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा
अंकित गोयल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
शिरीष एल सरदेशपांडे : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण
राकेश ओला : पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर
एम. राजकुमार : पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव
रागसुधा आर. : समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी
संदीप सिंह गिल : समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली - पोलीस अधीक्षक, हिंगोली

 
Ravindra Pardeshi ips

अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. (१) मोहित कुमार गर्ग, (२) राजेंद्र दाभाडे, (३) दीक्षितकुमार गेडाम, (४) अजय कुमार बन्सल, (५) अभिनव देशमुख, (६) तेजस्वी सातपुते (७) मनोज पाटील, (८) प्रविण मुंडे, (९) जयंत मीना, (१०) राकेश कलासागर,


सविस्तर बातमी लवकरच





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.