Watch video on YouTube here: https://youtu.be/Di54l5R1V5g
चंद्रपूरः शहरातील एकमेव ऐतीहासीक गोंडकालीन रामाळा तलाव वाढत्या प्रदुषणामुळे सौंदर्यीकरणचे काम सुरु करण्यात आले. पावसाळ्यादरम्यान हे काम बंद होते. आता तलावात तुडुंब पाणी भरलेले आहे. मात्र, मासे मृत असल्याची घटना समोर आली आहे. तलावाच्या काठावर मासे मृत आढळुन आल्याने तलावाच्या पाण्यातून दुर्गंधी सुटली आहे.
इको-प्रो या पर्यावरणप्रेमी संस्थ्येने मागणी रेटून धरल्यानंतर रामाळा तलावाचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण सुरु करण्यात आले. मागील फेब्रुवारीपासून त्यांच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला. पण, उन्हाळा संपून पावसाळा लागल्यानंतर पाणी भरले. सध्या पाणी असून, तिथे दुर्गंधी सुटली आहे. दरम्यान आज मृत मासोळ्या पाण्यावर तरंगताना आढळुन आल्या. या ठिकाणी मागील काही दिवसापासुन मासे मृत होत असल्याचे दिसुन येत आहे. मागील काही दिवसांत विसर्जन, गौरी आणि पूजेचे साहित्यहि इथे टाकण्यात आल्याचे दिसून आले. या तलावातील पाणी पुन्हा सोडून खोलीकरण आणि सौंदर्यीकरणचे काम पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
#khabarbat #india #chandrapur #live Ramala lake #News