बालमनापासुन स्वच्छतेचे संस्कार रुजवा - किरणकुमार धनावडे
चंद्रपूर (प्रतिनिधी)
दिनांक 15/10/2022 जागतिक हाथ धुवादिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन,जिल्हा परिषद चंद्रपुर च्या वतीने नुकताच चंद्रपुर तालुक्यातील चिंचाळा येथे घेण्यात आला. जिवणात स्वच्छतेच्या सवयी खुप मोलाच्या असुन, स्वच्छतेचा संबंध हा आपल्या आरोग्याशी आहे. सुरक्षित आरोग्य राहण्यासाठी बालमनापासुन स्वच्छतेचे संस्कार रुजवा. असे मत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) किरणकुमार धनावडे यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातुन व्यक्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जागतिक हाथ धुवा दिन जगभर साजरा होत असतांना, जिल्ह्यातील सर्वांमध्ये हाथधुण्याचे महत्व निर्माण व्हावे. यासाठी जिल्ह्यातील गावागावात हाथधुण्याचा कार्यक्रम घेवुन शाळेत मुलांना हाथधुण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्याच्या सर्वांना जिल्हास्तरावरुन सुचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय जिल्हास्तरीय हात धुवादिनाचा कार्यक्रम चंद्रपुर तालुक्यातील चिंचाळा या गावात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव आसवले यांनी केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता किरणकुमार धनावडे उपस्थित होते.
जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता किरणकुमार धनावडे यांनी शालेय विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, हात धुण्याचे जागतिक पातळीवर महत्व असुन, कार्यक्रमाद्वारा आज स्वच्छतेचा संदेश देण्याच काम केल्या जात आहे. आजाराचे प्रमाण कमी करायचे असेल तर, हाथ हे वेळोवेळी स्वच्छ करुन घेणे गरजेचे आहे. जिवनात सक्षम होण्यासाठी स्वच्छ वातावरणाची गरज असुन, स्वच्छ वातावरणासाठी प्रत्येक गावात सर्वांगीन शाश्वत स्वच्छता निर्माण करुन ,स्वच्छतेच्या प्रत्येक सवयी अंगवळणी असल्या पाहीजे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात शालेय मुलांसमवेत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे कृष्णकांत खानझोडे, प्रवीण खंडारे,संजय धोटे, तृशांत शेंडे, साजीद निजामी,मनोज डांगरे यांनी हितगुज करुन हात धुण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक तुकाराम गेडाम , भाऊराव घूगुल, पंकज उद्धारवार, मेघा शर्मा, प्रदिप टिपले, राहुल वेदय , योगिता येरणे, प्रविण डोरलीकर व शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.