अतिक्रमणामुळे चंद्रपुरातील रस्ते अरुंद आणि चौक बजबजले आहेत. यामुळे शहरसौंदर्याला बाधा पोहचत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. त्यामुळे आता मनपाने हे अतिक्रमण गंभीरतेने घेतले असून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. 29 ऑक्टोम्बरला चंद्रपूर मनपाने पोलीस बंदोबस्तात तुकुम भागात फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढले. यावेळी रामनगर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
चंद्रपुरात लोकसंख्या व वाहतुकीच्या तुलनेत फारच कमी रस्ते आहेत. यातच मुख्य रस्ते तर अतिक्रमणाने आणखी अरुंद झाले आहेत. रस्त्यावरच अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. काही मोठ्या व्यावसायिकांनी तर फुटपाथवरच पक्के बांधकाम केले आहे. चौकांची स्थितीही याहून वेगळी नाही. बागला चौक, जटपुरा गेट चौक, बंगाली कॅम्प चौक, तुकूम, एसटी वर्कशॉप चौक, बसस्थानक चौक यासारखे चौक अतिक्रमणाने बरबटले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याला ग्रहण लागत आहे. आता मात्र मनपा याबाबत गंभीर झाली आहे. मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमण, अवैध पक्के बांधकाम काढण्याचा सपाटा सुरू केला आहे.
Due to encroachment, the roads in Chandrapur are narrow and the squares are busy. Due to this, the beauty of the city is disturbed and traffic is also obstructed. So now the municipality has taken this encroachment seriously and has started a campaign to remove the encroachment. On October 29, Chandrapur Municipality removed the encroachments on the footpath in Tukum area under police force. At this time, Ramnagar Police had made a strong arrangement.