चंद्रपूर | शहरातील बावीस चौकातील श्री बालाजी मंदिरात दसऱ्यानिमित्त दिवसभरात नागरिकांनी बालाजीचं दर्शन घेतलं. सायंकाळी बालाजी यांच्या मुर्तीसह रथयात्रा काढण्यात आली होती. दसरा महोत्सवानिमित दरवर्षी बालाजी वॉर्डातून रथयात्रा काढण्यात येते. आज देखील हि पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली.
चंद्रपूर शहरात दसरा महोत्सवनिमित्त विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे रावण पुतळ्याच्या दहनाची मागील शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रावण दहन कार्यक्रम पार पडला. यावेळी रोषणाई आणि आतषबाजीने हा परिसर उजळून निघाला होता. आज शहरात रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, विविध रंगांची उधळण असलेली रांगोळी काढण्यात आल्या होत्या. दसरा महोत्सवानिमित निघालेल्या बालाजी रथयात्रा गांधी चौक, अंचलेश्वर गेट परत बालाजी मंदिर अशी आली. यावेळी तरुणांनी मोठ्या उत्साहनने रथ ओढला. यावेळी मिरवणूक महिला देखील सहभागी झाल्या होत्या.