खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची रविवारी पुणे येथे "शिक्षण परिषद व सन्मान सोहळा
जुन्नर /आनंद कांबळे
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि आदर्श शिक्षक सन्मान सोहळा पुणे येथील राजीव गांधी लर्निंग स्कूलचे नाट्यसम्राट विजय तेंडुलकर सभागृह येथे रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे,अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली..
*शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती व राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या प्रश्नावर विचार मंथन करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली असून या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी गृह, ग्रामविकास व परिवहन राज्यमंत्री मा.आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेसाठी मान्यवर वक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व विद्यमान सदस्य विश्वास नाना देवकाते ,राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर, राज्याचे शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार ,राज्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील कक्ष अधिकारी दीपक पाटील , शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड . प्रशासन अधिकारी मीनाक्षी राऊत हे मान्यवर असणार आहेत. या शिक्षण परिषदेमध्ये , या दिवशी पहिल्या सत्रामध्ये खाजगी शाळांचे प्रश्न, नवे शैक्षणिक धोरण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षणाचा दर्जा वाढविणे आधी बाबत राज्यातून आलेले प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान माजी मंत्री मा.बंटी.डी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे . या शिक्षण* *परिषदेमध्ये राज्यातील शिक्षणाशी संबंधित विषयांवर विविध ठराव संमत करण्यात येणार आहेत तर पुणे जिल्ह्यातील सुमारे सत्तर शिक्षक कर्मचाऱ्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेने केले असून ही परिषद यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष संतोष शिळमकर ,राज्य उपाध्यक्ष सारंग पाटील ,राज्यशिक्षकेतर प्रमुख जी.डी. मोराळे, राज्यसचिव धीरज गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव माने, पुणे शहराध्यक्ष विश्वास कोचळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना मोरे, पुणे जिल्ह्याचे सहसचिव निलेश डुंबरे, संतोष तनपुरे, श्रीकांत रहाणे,विजय राठोड हे परिश्रम घेत आहेत .या परिषदेसाठी राज्य पदाधिकाऱ्यांतून धुळे येथील महासचिव अंजन पाटील, राज्य मुख्याध्यापक अध्यक्ष सोलापूरचे जयवंत हक्के ,राज्य संपर्कप्रमुख कोल्हापूरचे आनंद हिरुगडे व बादशहा जमादार, मराठवाडा विभाग प्रमुख औरंगाबादचे संतोष पाटील डोणगावकर, राज्य शिक्षकेतरप्रमुख नाशिकचे विलास चौधरी ,राज्य संस्था प्रमुख औरंगाबादचे राजेंद्र वाणी, राज्य महिला आघाडी प्रमुख आदिती केळकर व नंदिनी पाटील,कोकण विभाग प्रमुख रत्नागिरीचे महेंद्र कापडी व पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सांगलीचे शशिकांत माळी व अशोक शिंदे यांच्यासह राज्यभरातील कार्यकर्ते या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत .तरी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समितीवर प्रेम करणाऱ्या सर्व शिक्षकांनी, संघटनेच्या सभासदानी व पुणे जिल्ह्यातील शिक्षण प्रेमीनी या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित राहून ही शिक्षण परिषद आणि सत्कार सोहळा यशस्वी करावा असे आव्हान समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केलेले आहे.
Education Conference and Honor Ceremony" of Private Primary Teacher Sevak Samiti in Pune on Sunday
.......,..........