या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहे. भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमन करणार आहे.
या यात्रेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.