गोंडपिपरी येथे झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराचे वितरण
-------------------------
उत्तम समाज निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची- माजी आ. संजय धोटे
--------------------------
गोंडपिपरी (प्रतिनिधी)- झाडीबोली साहित्य मंडळ (ग्रा) जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराचे वितरण नुकतेच माता कन्यका परमेश्वरी सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आम. एड संजय धोटे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, पोंभुर्णाचे माजी उपसभापती विनोदभाऊ देशमुख , मुलच्या माजी नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाडी बोलीचे जिल्हाप्रमुख कवी अरुण झगडकर यांनी केले. याप्रसंगी माजी आ. धोटे म्हणाले की, उत्तम समाज निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते . नव्या पीढीला वळण लावत बोलीभाषेसाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे, हे झाडीबोली साहित्य मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे,असे ते म्हणाले. माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवीत असतो. समाजाची गरज लक्षात घेऊन ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सुरू ठेवले पाहिजे,असे मत व्यक्त केले. याप्रसंगी अनिल आंबटकर ,भारती लखमापूरे,चंद्रशेखर कानकाटे ,सविता झाडे ,संजय येरणे ,संतोष मेश्राम ,डाॕ.मोहन कापगते ,सुरेश गेडाम ,नागेंद्र नेवारे ,अर्जुमन शेख,प्रा.रत्नाकर चटप ,गायत्री शेंडे ,प्रीतीबाला जगझाप , सुधाकर कन्नाके , संतोषकुमार उईके इत्यादी शिक्षकांना तर रणजित समर्थ सरपंच जुनासुर्ला व गणेश खोब्रागडे यांना झाडी युवा चैतन्य तर झाडी कार्यगौरव पुरस्कार धनंजय साळवे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामकृष्ण चनकापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतनसिंह गौर, अॕड.अरूणा जांभुळकर,संगिता बांबोळे,मनिषा मडावी, गुरूदेव बाबणवाडे, प्रशांत भंडारे,उध्दव नारनवरे,डाॕ.अशोक कुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.