Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर ११, २०२२

सख्या मामानेच केला चिमुकल्या भाच्याचा खून uncle who killed his little nephew

 

Beed : मामा भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना परळी तालुक्यात घडली असून मामाने आपल्या चार वर्षीय भाच्याचा तीक्ष्ण हत्यारांनी खून केल्याची घटना परळी तालुक्यात घडली आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मामाला अटक केली आहे.


मयत मुलाचे नाव कार्तिक विकास करंजकर वय ०४ वर्षे राहणार लाडेगाव पोलीस स्टेशन युसुफ वडगाव तालुका केज असल्याचे समजते. हा मुलगा त्याची आईने सोबत माहेरी आणला होता.आई सुरेखा विकास करंजकर हिचे काल दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी तिचा भाऊ /आरोपी नामे सैनिक लक्ष्मण चिमणकर वय २७ वर्षे राहणार नागापूर याच्यासोबत समजावून सांगत असताना भांडण झाले.तो त्याची आईला त्रास देत होता म्हणून बहीण ही माहेरी आली होती. तिने आरोपी भावाला काल रात्री भरपूर समजावून सांगितली. दोघा बहिण भावात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपीने पहाटेच बहिणीच्या मुलाचा/ भाच्याचा कुमार कार्तिकचा धारदार हत्याराने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला आहे अशी प्राथमिक माहिती आहे.

मुलगा ओरडल्यामुळे आईने त्याला तात्काळ सरकारी दवाखाना परळी,त्यानंतर सरकारी दवाखाना अंबाजोगाई व त्यानंतर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचारासाठी घेऊन गेली.परंतु मुलगा वाचू शकला नाही.आरोपी मामाला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व कर्मचारी स्टॉप हजर आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम सौ.नेरकर अंबाजोगाई यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून,पुढील तपास बीट अधिकारी पीएसआय पोळ हे करीत आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.