चंद्रपूर (Chandrapur Maharashtra): गोसेखुर्द धरणाच्या उपकालव्यात पोहण्याकरीता उतरलेल्या तिघां तरूणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी 5 सप्टेंबर रोजी चिमूर तालुक्यातील वाकर्ला गावात घडली. रंचू पुणेश्वर कोल्हे (वय 20) व आर्यन विलास बाळबूधे (17) असे मृतकाचे नाव आहेत.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर पासून पाच किमी अंतरावर वाकर्ला हे गाव आहे. येथील रंचू पुणेश्वर कोल्हे (वय 20) व आर्यन विलास बाळबूधे (17) व सोनटक्के हे तिघे तरूण शेतात कापूस पिकाला खत मारण्यासाठी गेले होते. शेतात खत मारल्यानंतर तिघेही तरूण शेतालगत असलेल्या गोसेखुद धरणाच्या उपकालव्याकडे पोहण्याच्या उदेश्याने गेले. मात्र, चीखलामुळे ते पोहताना फसले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या सहाय्याने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामाकरून शवविच्छेदनाकरीता चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यांनतर रात्रीच दोघांही तरूणांवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Two youths drowned in Gosekhurd canal
Chandrapur Maharashtra India MH34 News