रुग्णांचे बेहाल , राजुरा गोवरी मार्ग बनला जीवघेणा
माजी सभापती सुनील उरकुडे यांचे नेतृत्व.
राजुरा. जिल्हा .चंद्रपूर..
राजुरा गोवरी मार्ग ओव्हरलोड वाहतुकीमुळे पूर्णपणे उघडलेला आहे. या मार्गावर पायी चालणे नागरिकांना कठीण झालेले आहे. रुग्णांचे, शाळकरी विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे बेहाल आहेत. काल दिनांक २३सप्ते. रात्रोला एका रुग्णाला दवाखान्यात नेत असताना रस्त्यात वाहने फसलेली असल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला यामुळे गौवरी येथील नागरिकांनी रात्री अकरा वाजता चक्काजाम आंदोलन केलेले आहे. चक्क पोकलेन मशीन आडवी करून ट्राफिक जाम करण्यात आलेली आहे. माजी सभापती सुनील उरकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.
तब्बल 12 तासापासून आहे आंदोलनाचा तिला सुटलेला नाही.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. या मार्गाचे मजबूत खडीकरण व काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. या आंदोलनामध्ये प्रमोद मशारकर, रामदास देवाडकर,मारकंडी लांडे, दिगंबर देवाडकर, रमेश झाडे, अशोक भगत, अजय बांदुरकर, मारुती चूधरी,यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेला गोवरी राजुरा मार्गावरील खडीकरण व डांबरीकरण रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेलेला आहे. गोवरी जवळ रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे डांबर गायब झालेला आहे आणि महाकाय खड्ड्यांमुळे अपघाताचे वाढलेले आहे. वाहतूक प्रचंड प्रमाणात असल्यामुळे रस्त्यात दररोज वाहने फसतात त्यामुळे प्रवाशांची बेहाल होते. या मार्गावर गाडी चालवणे अपघातात निमंत्रण देणारे आहे रुग्णांचे बेहाल आहे. रस्त्यामुळे बस सेवा खंडित होत असल्यामुळे शालेय विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे बेहाल आहेत. या मार्गावरील रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावर दररोज अंदाजे 1500 पेक्षा अधिक व कोळसावाहू ओवरलोड वाहने धावत असतात.
रस्त्याची क्षमता नसतांना 60 -70 टन अवजड वाहने या मार्गावरून धावतात. मात्र या मार्गाचे मजबूत खडीकरण करण्यात आलेले नाहीत. मागील अनेक दिवसापासून रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याची मागणी नागरिकांची होते मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. गोवरी व रामपूर येथील नाली बांधकाम आहे संथ गतीने सुरू असल्याने रस्ता जीवघेणा ठरलेला आहे.शिवाय जुने झालेले पुलावरून लोखंडी सळाकी निघालेल्या आहेत व महाकाय खड्डे पडल्यामुळे ट्रक धावताना अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने दिलेली आहेत मात्र या मार्गाकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावरील अपघातही वाढलेले आहेत. आरटीओचेही या भागाकडे लक्ष नाही . विना नंबर प्लेट वाहने व शिकाऊ चालक मोठी वाहने चालवितात त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण नाही. या मार्गावरील वेकोली मधून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक तात्काळ बंद करावी किंवा दुसऱ्या मार्गाने वळती करावी अशी मागणी नागरिकांची आहे .
-------------------
सुनील उरकुडे
माजी सभापती, गोवरी.
राजुरा गोवरी मार्गाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले असल्यामुळे या मार्गावर प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरून शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना, रुग्णांना जाणे येणे कठीण झालेले आहे. दररोज रस्त्यावर वाहने फसतात त्यामुळे प्रवास करणे धोकादायक आहे . अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, ट्रक चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात यावर कुणाचेही नियंत्रण नाही. हा मार्ग जीवघेणा ठरलेला आहे. या मार्गाचे तात्काळ मजबूत काँक्रिटीकरण करण्यात यावे व ओवरलोड वाहतूक तात्काळ बंद करावे.