गडचिरोली (प्रतिनिधी) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . सदर मेळाव्यात आय. टी. आय. उत्तीर्ण माजी प्रशिक्षणार्थी, इयत्ता बारावी एम.सि.व्हि.सी. उत्तीर्ण व पॉलिटेक्निक उत्तीर्ण माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या भरती मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील विविध कंपन्याचे प्रतिनिधी हजर होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. योगेंद्र शेंडे होते. या मेळाव्यात गटनिदेशक आनंद मधुपवार, केशव डाबरे, बंडोपंत बोढेकर, एस.बी.आय. लाईफचे शाखा व्यवस्थापक उत्तम जांभूळकर, नवकिसान बायो प्लान्टेड नागपूर चे व्यवस्थापक पी. रिनायत,धूत ट्रान्समिशन औरंगाबाद चे प्रतिनिधी श्री. संदीप कुलकर्णी, डिस्टील एज्युकेशन प्रा.लि.चे प्रतिनिधी कु. मृणाली सुर्यवंशी, कौशल्य विकास अधिकारी श्री. गणेश चिमणकर , मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाचे प्रतिनिधी श्री .शेख आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गटनिदेशक भास्कर मेश्राम यांनी केले. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांच्या मार्गदर्शनात टीसीपीसी विभागाचे प्रमुख श्री. आनंद मधुपवार ,अमिर बोरकुटे , अशोक बुर्रेवार यांनी मेळावा आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
----------------------