Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १०, २०२२

गणेश विसर्जनात चोरीच्या घटना



चंद्रपूर । शहरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली. . गांधी चौकात बाप्पा ला निरोप देण्यासाठी आलेल्या महिलेचा सोन्याचा गोफ चोरीला गेला. 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी हरवली. 

Read News |  चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन, चौकशीचे आदेश  

चंद्रपूर शहरात आज गणेश विसर्जन पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात पार पडला. बाप्पा ला निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांनी गांधी चौक परिसरात उपस्थिती लावली. मात्र पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात काही घटना घडल्याविशेष म्हणजे सकाळपासून बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भोवळ आल्याने तात्काळ वाहनात टाकून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा मार्ग मिळत नव्हता.  हळूहळू वाहन पुढे गेले आणि त्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले.


पोलीस विभागाने अप्रिय घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते . गांधी चौकात महिला बाप्पा ला निरोप देण्यासाठी आली होती, गर्दी जास्त असल्याने कुणीतरी महिलेच्या गळ्यातून हार चोरी केला, याबाबत गांधी चौकात अनाऊन्समेंट करण्यात आली. 


शुक्रवारी सायंकाळी चोरीच्या घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरवणुकीत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण अखेरच्या दिवशी गांधी चौक परिसरात येत असतात. यंदा विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या गर्दीचा गैरफायदा घेत भामट्यांनी दागिने लंपास केलेत.

Read News |  चंद्रपूर : गणेश मिरवणुकीत लाठीचार्ज; गणेशभक्तांचे ठिय्या आंदोलन, चौकशीचे आदेश  

Ganapati Bappa | Ganesha devotees |  A gold sling was stolen from a woman | Gandhi Chowk Chandrapur | 14-year-old minor girl is missing.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.