चंद्रपूर । सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे जमिनीसाठी झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मनोहर निंबाजी गुरुनुले (वय 62 वर्ष), शारदा मनोहर गुरुनुले (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी धनराज निंबाजी गुरुनुले (वय 52) यास अटक करण्यात आली.
जमिनीवरून भावांमध्ये जोरदार झगडा झाला. त्यातच लहान भाऊ धनराज गुरुनुले यांनी आपल्या मोठा भाऊ मनोहर व वहीणी शारदा हिला सब्बलने मारहाण केली. त्यात मनोहर गुरुनुले हा जागीच ठार झाला, तर शारदा गुरुनुले हिला प्रथम सावलीला भरती करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र तिचाही मृत्यू झाला. या घटनेची माहीती पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले. आरोपी विरोधात कलम 302, 307 भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास नारायण येगेवार, अशोक मोहूर्ले, वसंत नागरीकर,सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे, जनार्धन मांदाळे, राजू केवट आदी पोलीस कमर्चारी करीत आहेत.