ब्लॉग लिहीणे आणि तो लोकांपर्यंत पोचवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. ब्लॉग अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी निरनिराळे पर्याय वापरावे लागतात. हे सर्व वेगवेगळे पर्याय सातत्याने कार्यरत राहील्यास ब्लॉगला कालांतराने स्थिर आणि संख्येने विपूल ट्रॅफिक मिळत जाते. जितके अधिक ट्रॅफिक तितकी अधिक प्रसिद्धी आणि जितकी अधिक प्रसिद्धी तितके अधिक ट्रॅफीक असे हे गुणोत्तर आहे.[1]
१. सोशल मिडीया - तुमच्या ब्लॉगची लिंक सर्वप्रथम तुमच्या संपर्कातील लोकांना सोशल मिडीयावरून पाठवायला सुरुवात करा. जसे फेसबुक, व्हॉटसॅप इत्यादि. हा लोकांपर्यंत पोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. येथे ज्याला यात रस असेल ते लोक भेट देतील आणि ट्रॅफिकचा पहिला ओघ तरी सुरु होईल.
२. सहसा तुमची लिंक लोक पहायला लागले की ती गुगल सारख्या सर्च इंजिनवर इंडेक्स म्हणजे यादित समाविष्ट होते. अशा वेळी इंटरनेटवर जेव्हा तुमच्या विषयाशी संबंधीत सर्च होते तेव्हा तुमचा ब्लॉगही रिझल्ट्स मध्ये दिसायला लागतो. हे इंडेक्सिंग तुम्ही स्वतःही करून घेऊ शकता. अर्थात त्याला थोडे तांत्रिक ज्ञान हवे.
३. तुमच्या लिखाणात असे शब्द वापरा जे लोक सहसा इंटरनेटवर सर्च करतात. अर्थात ते तुमच्या विषयाशी संबंधीत शब्द हवे. जसे सरकारी योजना असतील तर त्यात सरकार जे शब्द जाहीरातीत वापरते ते वापरा. यामुळे तुमचा ब्लॉग सर्च इंजिनवर अधिक वरती दिसेल.
या सगळ्या पर्यायांना अधिक प्रगल्भतेने वापरता येते पण त्यासाठी थोडे तांत्रिक ज्ञान हवे जे तुम्ही ऑनलाईन वाचन करून मिळवू शकता. जसे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, किवर्ड्स, सोशल मिडिया इ. खालील लिंकवरून अधिक माहिती मिळवू शकता. ब्लॉग अधिकाधिक वाचनीय आणि प्रेक्षणीय करता येईल ते पहा. या सगळ्यांचा ट्रॅफिकवर सकारात्मक परिणाम होतो.
sheetaluwach.com