चंद्रपूर दि. 15 :-चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा व शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सन 2021- 22 मध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा सत्कार आमदार (विधान परिषद) डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संताजी वस्तीगृह मूल रोड येथील सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ सुनीता दिनकर कुंभलकर प्रा.हृदयरोग विभाग नागपूर, डॉ. दिनकर कुंभलकर, नागपूर, डॉ. वासुदेव गाडेगोणे प्रा. सौ मृणालिनी धोपटे, रमेश भुते यांची मंचावर उपस्थिती लाभली होती याप्रसंगी डॉ. सुनिता कुंभलकर म्हणाल्या गुणवंतांनी दुसऱ्या बरोबर स्पर्धा करू नये दुसऱ्यांचे पाय ओढू नका दुसऱ्यांचे पाय ओढणारा खाली असतो स्पर्धा करायची झाल्यास स्वतः शीच करा असे प्रतिपादन केले. डॉ. दिनकर कुंभलकर म्हणाले की गुणवंतांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार ही संकल्पनाच मला भाऊक ठरली असे त्यांनी आवर्जून सांगितले,
मुलींचा सत्कार झाला ही गौरवाची बाब आहे. भारत मातेचा मुकुटमनी म्हणून सत्कार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली गुणवंतांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी डॉ. रामदासजी आंबटकर म्हणाले की समाजाला काही देणे लागते ही अभिलाषा मनात असल्याशिवाय समाजाचा उद्धार- विकास होऊच शकत नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला देश भक्ती ही देवपूजा जागृत करण्यासाठी समाज संघटन आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे यांनी सभागृह, वस्तीगृह ,पतसंस्था, महिला मंचाच्या बाबतीत विस्तृत माहिती दिली व कार्यकारी मंडळांच्या सदस्यांचे मनभरून कौतुक केले .पाहुण्यांच्या हस्ते समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल 11वी च्या 11 विद्यार्थिनींना वस्तू स्वरूपात मदत म्हणून सायकल देण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून एफ. ई. एस. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. विश्वास झाडे, डॉ. प्रमोद बांगडे, प्रा. श्याम धोपटे यांनी करून दिला. प्रा. सौ. मृणालिनीताई धोपटे यांनी संताजी महिला नागरिक सहकारी पतसंस्थेबाबत माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते संताजी महिला पतसंस्थेच्या महिला कार्यकारी सदस्यांचा तसेच रमेश भुते (सचिव) उमेश आष्टणकर, (व्यवस्थापक) संस्थेचे उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच संजय झाडे यांचे तर्फे 100 स्मृतीचिन्ह मोफत देण्यात आले त्यांचाही सत्कार करण्यात आला.डाॅ. वासुदेव गाडेगोणे,डॉ. स्नेहल पोटदुखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व रमेश भुते यांनी संस्थेच्या अहवाल वाचन केले व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन जयश्री मुळे सौ शितल कुंभलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अशोक कावळे, डॉ. विश्वास झाडे, बबन बांगडे, डाॅ. अनंत हजारे,प्रा. श्याम धोपटे, मनीष खनके, प्रा. दुर्वास वाघमारे, अजय वैरागडे, मनोहर बेले, विजय घटे, अॅड. अनिल गिरडकर, डॉ. प्रसाद पोटदुखे, सौ. शोभाताई भरडकर, स्नेहल बांगडे, प्रा. नामदेव वरभे, सौ. शैलेजा भलमे, वैशाली पोटदुखे,डॉ. भूपेश भलमे, उमेश आष्टणकर यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व समाज बांधव व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.