सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेची एक खिडकी सुविधा
https://pandal.cmcchandrapur.यंदा मनपातर्फे कोणतेही शुल्क नाही
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व रेन वॉटर हार्वेस्टींग देखाव्यास मिळणार बक्षिसे
चंद्रपूर २१ ऑगस्ट - चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजनेची (single window system ) सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज (Application) सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी आज दिली.
शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या उपस्थितीत गणेशोत्सव २०२२ साठी आढावा व मार्गदर्शन सभा अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात आज घेण्यात आली. याप्रसंगी शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, पोलीस विभाग, ट्राफिक पोलीस, विविध विभागाचे प्रतिनिधी व गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थीत होते. याप्रसंगी उपस्थितांना परवानगीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचे मार्गदर्शन करण्यात आले.
येत्या ३१ ऑगस्टपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. शासनाकडुन गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी गणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. गणेश मंडळांनी आयत्यावेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादरकरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. अन्यथा परवानगी नाही असे गृहित धरुन महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मनपातर्फे पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.
शासनाने 2022 च्या गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप परवानगी शुल्क व अनामत रक्कम न घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र.173/2010 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन सर्व उत्सव मंडळांनी करणे बंधनकारक असणार आहे. (One window facility of Municipal Corporation for permission of Public Ganeshotsav)
एक खिडकी योजना काय आहे ?
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission 2022 येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.
(One window facility of Municipal Corporation for permission of Public Ganeshotsav)