जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गवारी व सचिवपदी नवनाथ मोरे यांची निवड
जुन्नर :आनंद कांबळे
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अधिवेशन आदिवासी प्रबोधिनी, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तसेच जाहिर सभेस जनआरोग्य मंच चे डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
प्रतिनिधी सत्रात जिल्हा सचिव यांनी मागील तीन वर्षांचा संघटनात्मक व कार्यात्मक अहवाल सादर केला. या अहवालावर चर्चा होऊन सर्वानुमते पारित करण्यात आला. प्रतिनिधी सत्रात 100 प्रतिनिधींचा समावेश होता. जुन्नर, आंबेगाव, पुणे शहर या ठिकाणीहून विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात लढा तीव्र करा, आदिवासी व समाजकल्याण वसतिगृहे, तसेच आश्रमशाळांमधील प्रश्नांना घेऊन लढा तीव्र करा, नोकर भरती तत्काळ सुरू करा आदी ठराव अधिवेशनात पारित करण्यात आले. या अधिवेशनात 27 जणांची जिल्हा कमिटी एकमताने निवडण्यात आली.
नवीन जिल्हा कमिटी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष - अविनाश गवारी
सचिव - नवनाथ मोरे
कोषाध्यक्ष - बाळकृष्ण गवारी
सहसचिव - प्रवीण गवारी, समीर गारे
उपाध्यक्ष - रुपाली खमसे, अक्षय निर्मळ
सचिवमंडळ सदस्य - दीपक वाळकोळी, अक्षय घोडे, अक्षय साबळे
तर जिल्हा कमिटी सदस्य म्हणून संदीप मरभळ, राजू शेळके, विलास साबळे, कांचन साबळे, निशा साबळे, भूषण पोकळे, रोहिदास फलके, योगेश हिले, रोशन पेकरी, भार्गवी लाटकर, अभिषेक शिंदे, गणेश जानकथ, सचिन साबळे, रवी साबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी एस एफ आय चे माजी राज्य सरचिटणीस डॉ. महारूद्र डाके यांनी प्रतिनिधीना संबोधित केले.
तसेच घोडेगाव प्रकल्प स्तरीय समितीचे दत्तात्रय गवारी, माकपचे जुन्नर तालुका सचिव गणपत घोडे, आंबेगाव तालुका सचिव बाळू वायळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, शिक्षक समितीचे नेते बाळासाहेब लांघी, आदिवासी अधिकार मंचाचे संजय साबळे, किसान सभेचे लक्ष्मण जोशी, मोहन लांडे आदींनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.