ग्रामीण भागातील ४१ विकासकामांना मिळणार गती
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असुन ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास निधी अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. सदर निधीतुन ग्रामिण भागातील ४१ विकासकामांना गती मिळणार आहे. यात सिमेंट काॅंक्रीट रोडसह विविध विकासकामांचा समावेश आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या भागातील विकासकामांसाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी खेचुन आणला आहे.
या निधीतुन ग्रामीण भागात अभ्यासिका, पांदणरस्ते, सामाजिक सभागृह यासह विविध विकासकामे केल्या जात आहे. असे असतांना या भागातील अपेक्षित अशा विकासकामांसाठी निधीची कमतरता पडत होती. त्यामुळे
ग्रामविकास निधी अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याचा पाठपूरावाही त्यांच्या वतीने सातत्याने सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले आहे. या भागातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामूळे या भागातील विकासकामांना आता गती प्राप्त होणार आहे.
पडोली येथील पाच सिमेंट काॅंक्रीट रोड, साखरवाही येथे वाचनालय व तिन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, छोटा नागपूर येथे व्यायमशाळा व नाल्याचे बांधकाम, दाताळा येथे दोन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, ताडाळी येथे मैदानाचे व सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, पिपरी येथे दोन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, नागाळा येथे सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, सिदुर येथे सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, उसगाव येथे सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, महाकुर्ला येथे दोन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, वेंडली येथे दोन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, चिंचाळा येथे दोन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, मोरवा येथे वाचनालय आणि सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, कोसारा येथे दोन सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, खुटाळा येथे सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, वढा येथे सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, धानोरा येथे रस्त्याचे खडीकरण आणि सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, म्हातारदेवी येथे रस्ता खडीकरण आणि सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, सोनेगाव येथे रस्ता खडीकरण आणि सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, मारडा येथे रस्ता खडीकरण आणि सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, चारगाव येथे रस्ता खडीकरण आणि सिमेंट काॅंक्रीट रोडचे बांधकाम, आदि कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे.