कृष्णाजी नागपुरे,85 वर्षाचे तरुण व्यक्तिमत्त्व. आज त्यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे चंद्रपुर येथे अवॉर्ड मिळाला.80 वयाच्या वरील श्रेणीत सतत 40 मिनिटे पाण्यावर तरंगत 37 प्रकारचे योगासने करण्याचा त्यांनी देशातील पहिला रेकॉर्ड केला. ते शिक्षक होते,त्यांना गाणे ,कवायती,योगासने करण्या चा छंद जडला.ते संपुर्ण आयुष्यात सर्व क्षेत्रात प्रथम राहले. ते भोई समाजाचे संस्थापक अध्यक्ष आजही आहेत.निवृत्ती नंतर अनेकांना आजार होतात, दवा,दवाखाने करावी लागतात कारण आपली जीवन शैली चुकीची आहे हे आपल्या ला कळत नाही. नागपुरे सरांनी आपल्या प्रामाणिक, चारित्रवान जीवन, नियमित, नियोजित जीवन ,व्यायाम ह्याचे जोरावर 85 वर्षे उलटूनही तरुण जिवन जगत आहेत.आज त्यांनि केलेला रेकॉर्ड हा चंद्रपुर आणि देशवासियांना प्रेरणा देणारा आहे. आपण कसे चांगले स्वास्थ्य मिळवू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. India Book of Records
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या वतीने त्यांना किमान आठ प्रकारात पाण्यात योगाची प्रात्यक्षिके दाखवावयाची होती, परंतु त्यांनी ३७ प्रकारात ही नोंद केली. हा विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे न्यायाधीश डॉ मनोज तत्ववादी यांनी सांगितले की या प्रकारचा प्रयत्न भारतात यापूर्वी झालेला नाही. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने अशीही अट टाकली होती की योगा ची संपूर्ण प्रात्यक्षिके योगशास्त्राचे अनुसार बरोबर आहेत की नाही हे तपासून पाहण्यासाठी ते का योग शिक्षकांची उपस्थिती असावी, श्री विजय चंदावार यांच्या रूपाने ती पूर्ण झाली. पाण्याची खोली आठ ते दहा फूट किमान असावी, जलतरण केंद्राची रीतसर परवानगी घ्यावी, प्रात्यक्षिक करताना डॉक्टरांची टीम उपस्थित असावी, योग प्रकाराची प्रत्येक मुद्रा ही शंभर टक्के पूर्ण केलेली असावी एखाद्यावेळेस ची अपूर्ण आकृती मोजली जाणार नाही, अशा अटी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे दिल्या होत्या त्या कृष्णराव नागपुरे यांनी पूर्ण केल्यात.
तत्पूर्वी कृष्णराव नागपुरे यांची प्रकृती हे योग प्रकार करण्यासाठी तंदुरुस्त आहे अशा प्रकारची कबुली डॉक्टरांनी दिली आणि यानंतर चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार किशोर भाऊ जोरगेवार, नगरसेवक पप्पू देशमुख, माजी नगरसेविका सुनिता लोंढिया, ज्येष्ठ नागरिक विजय चंदावार, महापारेषण अधीक्षक अभियंता प्रफुल अवघड, समशेर बहादूर समन्वयक जिल्हा नेहरू केंद्र, डॉक्टर अजय कांबळे, चंद्रपूर मधील पर्यावरण तज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे आणि डॉ योगेश दूधपचारे, माजी नगरसेवक बंडू हजारे, जलतरण केंद्रातील प्रशिक्षक निळकंठ चौधरी, तसेच चंद्रपूर मधील अनेक गणमान्य नागरिक यांच्या उपस्थितीत कृष्णराव नागपुरे गुरुजी, यांनी योगाची ३७ प्रात्यक्षिके करून दाखविली. यानंतर एका कार्यक्रमात कृष्णराव नागपुरे गुरुजी यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे पदक प्रमाणपत्र आणि टेन देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीहरी शेंडे यांनी केले, आभारप्रदर्शन सुवर्णा नागपुरे यांनी केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. India Book of Records