Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

जम्मू दूरदर्शनवर झळकले शशांक कुलकर्णी




विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवर संशोधन करणारे आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त कृषी धोरण शास्त्रज्ञ शशांक कुलकर्णी (Shashank Kulkarni) यांची 

Doordarshan Jammu 

 जम्मू दूरदर्शन वर 'स्वास्थ-सुखम' (

SWASTHYA SUKHAM I 

) या कार्यक्रमात मुलाखत आयोजित करण्यात आली होती. जम्मू दूरदर्शन चे सहाय्यक संचालक सुकृती शर्मा (sukruti Sharma) यांनी ही मुलाखत घेतली. 


हरित क्रांती, स्वामीनाथन आयोग, शाश्वत शेती, नागरिकांचे स्वास्थ्य यांसारख्या विविध मुद्द्यांवर ही मुलाखत रंगली. मुलाखतीत बोलताना कुलकर्णी म्हणाले की शाश्वत शेती विकासावर आपल्याला भर द्यावा लागेल. विषयुक्त अन्नामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्मितीसाठी धोरणात्मक कार्य करावे लागेल. या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी श्री गौतम, दूरदर्शन  अभियांत्रिकी विभागाचे संचालक रवी कुमार (Ravi kumar) यांचे मार्गदर्शन लाभले.

शशांक कुलकर्णी हे प्रख्यात कवी, लेखक, वक्ता आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी धोरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९९० साली महाराष्ट्रातील साखराळे (जिल्हा सांगली) गावात झाला. त्यांनी जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन विभागात   विद्यापीठ अनुदान आयोगाचे सीनिअर रिसर्च फेलो या नात्याने विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी जगातील विविध देशांनी त्यांचा गौरव केला आहे. 

विविध विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये दहाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये लेखन केले आहे. पूज्य द्वारकानाथ शास्त्री राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना 'बाबा लक्ष्मण दास राष्ट्रीय स्मारक निर्माण सेवा समिती'चे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते, ही जम्मू आणि काश्मीरची एक अभिनव सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध स्वाहिली विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे.
 Doordarshan-Prasar-Bharati-Shashank-Kulkarni



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.