Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १८, २०२२

पाटाळा व अन्य गावांना महापुराचा फटका

 वेकोलि प्रबंधनाच्या नियोजनशुन्यतेमुळे 

पाटाळा व अन्य गावांना महापुराचा फटका- हंसराज अहीर
वेकोलि माजरी क्षेत्राची जबाबदारी निश्चित करुन नुकसानभरपाई वसूल करावी. 



चंद्रपूर / यवतमाळ:- (Chandrapur, Yavatmal) वेकोलि प्रबंधनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे भद्रावती तालुक्यातील पाटाळा, माजरी वस्ती, माजरी कॉलरी, नागलोन, कुचना, राळेगाव, थोराणा, चालबर्डी व अन्य गावांना महापुराचा तडाखा बसुन हजारो हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच पुरामूळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तुंच्या अभुतपूर्व नुकसानीस वेकोलिव्दारा मनमानीने टाकलेले ढिगारेच कारणीभूत असल्याचा आरोप पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यानी केला असून झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वेकोलि माजरी प्रबंधनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. Hasnraj Ahir

माजरी-पाटाळा क्षेत्र समस्या निवारण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी हंसराज अहीर  यांना निवेदन सादर करून लोकांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. माजरी वेकोलि प्रबंधनाने मनमानीपणे नदीकाठी जागोजागी ओव्हरबर्डनचे ढिगारे उभे केल्याने नागरिकांना महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले असून शेतीच्या अभुतपूर्व नुकसानीला वेकोलि प्रबंधन जबाबदार असल्याची व्यथा या शिष्टमंडळाने अहीर यांच्यासमोर कथन केली पुरप्रभावित शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत. तसेच घरांचे, अन्नधान्यांचे व बि-बियाणांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने न झाल्यामुळे या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. (Flood 2022)

पुरप्रभावित शेतीचे तात्काळ पंचनामे करावे, शेतीवर निर्भर लोकांना रोजगार द्यावा. 

हंसराज अहीर यांनी राज्य शासनाने पुरपिडीतांना नुकसान भरपाई देण्याची भुमिका घेतली असल्याचे सांगत अहीर यांनी प्रशासनाने पुरपिडीतांना तातडीची मदत उपलब्ध करावी अशी मागणी केली. आजपावेतो या तालुक्यातील अनेक गावांना कधीही पुराचा स्पर्श झाला नसतांना यावेळी अनेक गावांना पुराने वारंवार वेढून पुराचा तडाखा दिला. त्यामुळे या मागील निश्चित कारणांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी व अन्य कारणांची शहानिशा करुन उपाय योजावेत अशी मागणीही हंसराज अहीर यांनी केली आहे. प्रशासनाने पुरप्रभावित शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे, शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार हिरावल्या गेल्याने त्यांना कंपनी किंवा अन्यत्र रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात तातडीच्या आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्या व आवश्यकतेनुसार सोईसुविधा पुरवाव्यात अशी सुचनाही अहीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. जिल्ह्यांत सर्वत्र पुरामूळे शेतीचे. घरांचे अन्नधान्यांचे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने दिलासादायक कार्यवाही करावी असेही पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

जि प चे माजी सदस्य प्रविण सुर यांच्या नेतृत्वात हंसराज अहीर यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात कुसनाच्या सरपंच सुचिता ताजणे, नागलोनचे सरपंच रवि ढवस, विस्लोन चे सरपंच अशोक सातपुते, पाटाळाचे सरपंच विजेंद्र वासनखेडे, चालबर्डीचे सरपंच विजय खंगार, मनगावचे सरपंच सुनिल खामनकर, हेमंत महातळे, प्रफुल्ल ताजणे, अरविंद ठेंगणे, भारत वांडरे, प्रदिप हेकाड, विकास उपरे, नामदेव गोंडे, मारोती पंधरे, दिलीप चवले, बळीराम मंधारे, सुभाष लांडगे, अनिल खामनकर, बबन बदकी, सुनिल साबडे, मनोरमा बड, ज्योती लांडगे, प्रमोद आस्वले, प्रवेश ताकसांडे, सचिन पाचभाई, पत्रकार राजू रेवते, रवि भोगे, रवि कुद्दुला व अमृता सुर आदींचा समावेश होता.

Chandrapur, Yavatmal Hasnraj Ahir Flood 2022


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.