चंद्रपूर (Chandrapur News)- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेमध्ये जागतिक आदिवासी दिन दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत व विद्यार्थ्यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदिवासी दिनानिमित्त शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी महिलांचा पेहराव केला होता, शाळेतील केजी १ ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. azadi ka amrut mahotsav
याप्रसंगी माहिती देतांना मुख्याध्यापक नागेश नीत म्हणाले की, जगभरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांची संस्कृती,भाषा आणि अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी तसेच आदिवासी जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक राज्यात असलेले आदिवासी हे मुलनिवासी आहेत. याप्रसंगी शिक्षकांनी देशातील आदिवासी बांधवांच्या जिवनावर उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती सादर केली. कार्यक्रमात नृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नागेश नीत यांच्या हस्ते रजिस्टर वाटप करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका अंडेलकर, वलके, इरपाते, भास्कर गेडाम, आनंद गेडाम, धुर्वे व इतर शिक्षकांची उपस्थिती होती.