Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

Chandrapur Breaking News Headlines चंद्रपुरात घराची भिंत कोसळली; 12 वर्षीय मुलाचा मृत्यू



chandrapur india


चंद्रपूर (Chandrapur News) - पठाणपुरा मार्गावरील जोड देऊळ भागात राहणाऱ्या भागात भिंत कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अधिराज बावणे असे मृत तरुणाचे नाव आहे. 

गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मंडळ कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिक श्री च्या आगमनाच्या तयारीला लागले आहे. 12 वर्षीय अधिराज बावणे आपल्या मित्रांसह घराजवळ तयारी करू लागला. अधिराज हा आपल्या आजी-आजोबा हिवरे यांच्यासोबत राहत होता.
श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी अधिराज ने साफ सफाई सुरू केली. आपल्या घराच्या भिंतीजवळ असलेली रेती अधिराजने उचलत बाजूला करण्यास सुरुवात केली मात्र रेती उचलल्यावर अचानक भिंत अधिराज च्या अंगावर कोसळली. अचानक घडलेल्या ह्या प्रकाराने नागरिकांनी तात्काळ अधिराज ला बाहेर काढले. रुग्णालयात हलवीत असताना मृत्यू झाला. अधिराज हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 


breaking news
breaking news headlines
news live
google news
local news 
azadi ka amrut mahotsav
chandrapur news
chandrapur india
news 34 chandrapur

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.