Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २८, २०२२

chandrapur Landslide News | घुग्गुस भूस्खलन | भाजपतर्फे प्रत्येकी 3 हजाराची मदत

 भूस्खलन प्रकरणी वनमंत्री श्री मुनगंटीवार यांनी दिली घटनास्थळाला भेट



घुग्गुस शहरातील भूस्खलन प्रकरणी जमीनित गेलेल्या घरानजीकची जी घरे सावधानीचा उपाय म्हणून इतरत्र हलविण्यात आली त्या कुटुंब प्रमुखांना भारतीय जनता पार्टी तर्फे प्रत्येकी 3 हजार रु. ची मदत या कुटुंब प्रमुखांना देण्यात येणार आहे.

आज दि. 27 ऑगस्ट रोजी वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस शहरात भुस्खलनाची घटना घडली त्या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत याविषयी माहिती दिली. या संदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेवून उपाययोजनेची दिशा निश्चित करू असेही श्री मुनगंटीवार म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे , विवेक बोढ़े आदी भाजप पदाधिकारी  तसेच जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने , वेकोली चे महाप्रबंधक श्री आभास सिंग , डीजीएमएस चे अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.