अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घुग्घुस शहरातील शास्त्रीनगर, आंबेडकरनगर व शिवनगर वसाहतीत वर्धा नदीच्या पूराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्यांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रत भागाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
प्रसंगीच पुरपीडीतांच्या अडचणी, समस्या समजून घेतल्या. आंबेडकरनगर येथील अनेक घरात पूराचे पाणी शिरल्याने नागरीकांनी घरातील सामान बाहेर काढले. घुग्घुस भाजपतर्फे या पुरपीडीतांना जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली. यासोबतच आंबेडकर भवन व टेम्पो क्लब येथे त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घुग्घुस भाजपतर्फे देखील या पूरग्रस्तांना वेळोवेळी मदत करण्यात येत आहे. तसेच स्थानिक तलाठ्यांमार्फत पंचनामे करणे देखील सूरू आहे.
अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्यामुळे वर्धा नदी लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी शिरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी याआधीच प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, त्यांच्या सुचनेप्रमाणे प्रशासनाचे मदतकार्य ही सुरु आहे. यासोबतच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असेल प्रशासनाबरोबर मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजप जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. पुरपीडीतांना सर्वतोपरी मदत भाजपातर्फे करण्यात येईल. असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.
यावेळी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, नपचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, श्रीकांत सावे, मल्लेश बल्ला, विक्की सारसर, सुनील बाम, अनुप जोगी, गुरूदास तग्रपवार नपचे कर्मचारी विठोबा झाडे, हरी जोगी यांचेसह आदि मंडळी उपस्थित होते.
Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam | Upper Wardha Dam, floodwaters of the Wardha River entered Shastrinagar, Ambedkarnagar and Shivnagar Colonies in Ghugghus town around midnight on Monday, causing extensive damage to household materials. Visited this flooded area and inspected the damage.