Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १४, २०२२

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने अपघातग्रस्तांना आर्थिक मदत




कीलोणी येथील मेश्राम व कूळमेथे कुटुंबीयांना मदत


भद्रावती (प्रतिनिधी) :
          स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील कीलोनी गावातील अपघातग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्यात आली. 
             तालुक्यातील मौजा किलोनी येथील राजश्री राजू मेश्राम यांचे पती राजू मेश्राम हे दि. ८ जुनला भद्रावती येथे जात असताना ट्रक आणि गाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःख व जवाबदारीचा डोंगर कोसळला. त्यामुळे त्यांची मेश्राम कुटुंबीयांचे सांत्वन देण्याकरीता रवि शिंदे त्यांच्या घरी पोहोचले व पत्नी श्रीमती राजश्री राजू मेश्राम यांना स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली. सोबतच सुरज मुकुंदा कुळमेथे हे सुध्दा अपघात गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय येथे पाठविण्यासाठी मदत केली व पुढील उपचार ट्रस्ट द्वारा करणार येईल असे सांगितले. 
         यावेळी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे, किलोणी येथील अजित फाळके, अशोक निखाडे, गणेश जीवतोडे, अविनाश गोंडे, ग्राम पंचायत सदस्य मोहन व्यंकटी भुक्या, ललिता आत्राम व अन्य गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.
                स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट ही शेतकरी, शेतमजूर गोरगरीब जनतेकरीता असुन सातत्याने लोकसेवेचे कार्य ट्रस्ट करीत राहणार आहे, असे वक्तव्य रवि शिंदे यांनी यावेळी केले.



Late.  Financial assistance to accident victims on behalf of Srinivasrao Shinde Memorial Ravindra Shinde Charitable Trust

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.