Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २४, २०२२

बाबुपेठ उड्डाणपुलाकरिता चंद्रपूर महानगरपालिकेकडून ५ कोटी निधी द्या




काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मागणी


चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत बनविण्यात येत असलेल्या बाबुपेठ उड्डाणपूलकरीता एकूण रु. ६१.५७ कोटी खर्च अपेक्षित आहे. या पैकी रु. १६.३१ कोटी रेल्वेने, रु. ५ कोटी महानगरपालिका चंद्रपूरने व रु. ४०.२६ कोटी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावयाचा होते. त्यानुसार बाबुपेठ उड्डाणपुलाकरिता चंद्रपूर महानगरपालिकेकडून ५ कोटी निधी द्यावे, अशी मागणी आज २३ मे रोजी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

उडाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यास चंद्रपूर शहरातील बाबुपेठ निवासी असलेली नागरिकांच्या दळण-वळण चा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो. बाबुपेठ निवासी नागरिकांची रेल्वे गेटमुळे होत असलेली गैरसोय येत्या पुढील काळात दूर होईल. त्या करीता आज २३ मे रोजी काँग्रेस नगरसेवक व काँग्रेस कार्यकत्यांनी प्रशासक व आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेत निवेदन दिले.

त्यांनी हा निधी लवकरच देऊ, असे आश्वासन दिले. या प्रसंगी माजी काँग्रेस गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनीता लोढीया, माजी नगरसेविका संगीत भोयर, शलिनी भगत, घनशाम वासेकर, सुरेश खपणे, राजेंद्र आत्राम, अरविंद मडावी, विशाल भगत, बिकास टीकादर, मनोज वासेकर शाम राजूरकर सुरेश आत्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Provide 5 crore fund from Chandrapur Municipal Corporation for Babupeth flyover

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.