Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २४, २०२२

आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा MLA Kishor Jorgewar had a discussion with Chief Minister Uddhav Thackeray

कळमना येथील बांबू आगीच्या घटनेसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा



कळमना येथील पेपरमिलच्या बांबू डेपोला लागलेली आग अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेली नाही, या भागात वारा सूरु आहे. या घटनेच्या गांभिर्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधून चर्चा केली.

 आमदार जोरगेवार यांनी आज 23 मे रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचीही भेट घेत आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहे.  




     आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कळमना येथील जळालेल्या बांबु डेपोची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता बोबडे,  सेव्ह फॉरेस्ट संस्थाचे अध्यक्ष सतिश नाईक, विक्रम पंडित, रोहित पंदिलवार, यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार यांच्यासह पेपरमिलच्या अधिकाऱ्यांची  उपस्थिती होती.


MLA Kishor Jorgewar had a discussion with Chief Minister Uddhav Thackeray

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.