इंडियन आयडॉल स्पर्धेत टॉप टेन राऊंड पर्यंत मजल मारलेल्या नागपूरकर केवल्य केजकर या प्रतिभावंत गायक कलाकाराचा मनसेच्या वतीने सत्कार आणि गौरव करण्यात आला.
मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या निवासस्थानी केवल्य व त्यांच्या मातोश्री सौ. साधना केजकर यांच्या सत्कार प्रसंगी मनसे नागपूर शहर अध्यक्ष अजय ढोके, शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर सचिव शाम पूनियानी, मनसे सांस्कृतिक सेलच्या विभाग अध्यक्षा सौ. नीता ठाकूर, विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर, अंकित झाडे,विक्की कोरडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
त्रिमूर्ती नगर परिसरात वास्तव्यास असलेले केवल्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले असून त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेवर टेक्सटाइल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या मातोश्री सौ साधना केजकर ह्या संगीतात पदवीत्तर असून केवल्यला संगीताचे बाळकडू आईकडून मिळाले. अतिशय सुरेल आवाजाचा धनी असलेल्या या प्रतिभावंत नागपूरकर तरुणाने इंडियन आयडॉल सीझन ११मध्ये आपल्या गायकीने देशभरातील श्रोत्यांचे मनं जिंकली आहेत.
कोरोनाच्या आघाताने कायमस्वरूपी वडिलांना आलेले आजारपण, घरप्रपंच सांभाळायची आलेली जिम्मेदारी सोबत संघर्षमय परिस्थितीचा सामना करीत आपल्या कलेला जिवंत ठेवत केवल्यने गाठलेला हा टप्पा निश्चितच अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक आहे असे प्रशंसात्मक उद्गगार श्री हेमंत गडकरी यांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देतांना सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
श्री राजसाहेब ठाकरे यांचा मी पहिल्यापासूनच चाहता असून मनसेच्या या अनपेक्षित सत्काराने मी भारावून गेलो आहे असे भावनिक मत केवल्य केजकर यांनी व्यक्त करीत स्वर्गीय श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे सुरेल सादरीकरण याप्रसंगी करीत मनसेचे आभार मानले.
Emerging artist Kevalya Kejkar felicitated by MNS