संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६मे:-
स्थानिक जंगलामध्ये फळ झाडांचे प्रमाण खूप कमी आहे.यामुळे पक्षी, प्राणी हे अन्न शोधत गावातील घरापर्यंत येतात. यातूनच वन्यप्राणी व मानव संघर्ष उभा राहतो. शाकाहारी पण मानवाला हानी पोहोचविणारे वन्य प्राणी आपल्या अन्नाच्या शोधात गावात व शेतात पिकांची व मनुष्य जीवांची हानी करतात. हे आपल्याला कुठेतरी टाळता येईल काय? स्थानिक जनतेच्या सहकार्याने यासाठी काही उपाय योजना काही प्रयत्न करता येईल काय?असा विचार गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सशस्त्र दूरक्षेत्र पवनीधाबे चे पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख यांच्या डोक्यात व मनात आला. मग त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आपली ही कल्पना त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्याही सहकाऱ्यांनी मग या अभिनव कल्पनेला पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला. मग यातून बीज बॉक्स बियाणांची पेटी हा उपक्रम पुढे आला. झाले ठरले आता ही कल्पना स्थानिक जनतेत रुजवायची. याकरिता आपण खात असलेल्या फळ बिया जमवून, त्या पावसाळ्यात जंगलामध्ये फेकून द्यायच्या.जेणेकरून त्यामुळे फळ झाडांचे प्रमाण जंगलामध्ये वाढेल. पक्षी, व शाकाहारी वन्य प्राण्यांची काहीतरी खाण्याची व्यवस्था होईल. कितपत फायदा होईल. याची कल्पना नाही, परंतु आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख यांनी दिली.अझरूद्दीन शेख यांनी ही आपली कल्पना धाबेपवनी गावामधील लोकांना हा आपला अनोखा उपक्रम व मानव व वन्य प्राणी यांच्यासाठी कसे लाभदायी आहे अन्नाच्या शोधात शाकाहारी परंतु मानव जीविताला हानी पोहोचविणारे वन्यप्राणी गावात येणार नाही त्यांच्या अन्नाची व्यवस्था जंगलातच होईल त्यामुळे मानव जातीला वन्य प्राण्या पासून कुठलाही धोका होणार नाही ही मानव-वन्यप्राणी संघर्ष ची तीव्रता कमी करता येईल. बीज बॉक्स (बियाणांची पेटी)या उपक्रमाची कल्पना त्यांच्या समोर ठेवली, याचे महत्त्व पटवून देवून फळबिया गोळा करण्याकरिता बीज बॉक्स तयार करून ते गावातील मुख्य ठिकाणी ठेवले आहेत. याला गावकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा.असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी गावकऱ्यांना केले आहे. या मोहिमेला गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.हा अभिनव अनोखा उपक्रम राबविण्या करिता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र धाबेपवनी येथील पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख, सहायक फौजदार रमेश नैताम, पोलिस हवालदार अश्विन देशकर, पोलिस नायक अशोक सोडगीर, पोलिस शिपाई आनंद रुद्रवाड,पालीकराम गदवार, आय.आर.बी. गट क्रमांक 15 चे पोलीस उपनिरीक्षक दाते, पोलीस हवालदार विलास लांडगे,पोलीस शिपाई रितेश वानखेडे, पोलीस हवालदार दिपक सोनवाणे, मंगेश धुर्वे व पोलीस सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी चे अंमलदार यांनी विशेष सहकार्य लाभत आहे.मात्र पोलीस सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनीचा हा अनोखा व अभिनव उपक्रम अर्जुनी मोरगाव तालुक्यात चर्चेचा विषय झाला असून, काहीही का असेना पण, खाकी वर्दीतील दर्दी माणसांचा परिसरात प्रसंशा व कौतुक केले जात आहे.