Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २५, २०२२

माजी नागराध्यक्ष आहेतेशाम अली यांच्या 49 व्या वाढदिवसा दिवशी 151 रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा ४९वा वाढदिवस मंगळवार दि.२४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीराने व "माझा वरोरा" या स्मरणिकेच्या प्रकाशनाने आलिशान सेलिब्रेशन हॉल येथे साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष म्हणून मागील पाच वर्षांत शहरात केलेल्या कोट्यावधीच्या विकास कामाचा आढावा,त्यांच्या अनुभवाचा लेखाजोखा म्हणून " माझा वरोरा " या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

येथील आलिशान सभागृहात सदर स्मरणिकेचे प्रकाशन लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील , जेष्ठ कवी, लेखक, साहित्यिक ना. गो.थुटे,डाॅ.हेमंत खापने,श्रीकृष्णा घड्याळपाटील,रोटरीचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.श्रीपाद पाटिल यानी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की वरोरा शहरात सर्व पक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन संपूर्ण शहराचा विकास करणारे नगराध्यक्ष,वरोरा शहराचा ईतीहासात कोट्यावधिची विकास कामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलविनारे नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण होईल,प्रमाणिक- मृदूभाषी,सर्व धर्माचे आदर करणारे, सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारे, व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ओळखले जाणार,आपण केलेले कार्य या शाहरची जनता कधिच विसरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. बाबासाहेब भागडे यांनी याप्रसंगी प्रकाशन सोहळ्याचे संचालन केले.
रक्तदान शिबिरामध्ये १५१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले हे विशेष. रक्तदान शिबिरासाठी नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे यांचे सहकार्य मिळाले.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध संघटनाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व सर्व स्तरातील हजारो नागरिकांनी कार्यक्रमस्थळी येऊन अहेतेशाम अली यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.