घनश्याम दरबार यांची माहिती
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनतर्फे विविध मागण्यांसाठी उद्या मंगळवार 31 मे रोजी एक दिवसीय पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा अध्यक्ष घनश्याम दरबार यांनी दिली.
दरबदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोलपंप चालकांना अनेकदा आर्थिक नुकसान सहन करावे लागले. इंधन दरबदल करताना डिलर्सना विश्वासात घेतले जावे, तसेच पेट्रोलपंप चालकांसाठी शासनाने एक धोरण तयार करावे, ही आमची मागणी आहे, असे दरबार यांनी सांगितले.
या मागणीसाठी 31 मे 2022 रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान,
महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे वर्किंग कमिटी सदस्य तथा चंद्रपूर गडचिरोली जिल्हा अध्यक्ष घनश्याम दरबार यांनी मंगळवारी पेट्रोलपंपांवरील शिल्लक पेट्रोल व डिझेल विकले जाईल. साठा संपल्यावर 31 मे रोजी एक दिवस कोणताही डिलर कंपनीकडून पेट्रोल-डिझेल खरेदी करणार नाही, असे सांगितले.
Petrol-diesel purchase agitation on May 31 in Chandrapur and Gadchiroli districts