Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०९, २०२२

लेण्याद्री जबाबदार पर्यटन कार्यशाळा आणि अष्टविनायक नकाशा अनावरण कार्यक्रम Pune Junnar

जुन्नर पर्यटनासाठी सर्व घटकांना एकत्रित आणून समतोल पर्यटन विकास करणार ....आमदार अतुल शेठ बेनके



जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी लोकप्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शासन पातळीवर करावयाच्या कामाची विभागणी करण्यात येईल आणि कालबद्ध रीतीने हा कार्यक्रम पुढे नेण्यात येईल. यासाठी पर्यटनातील सर्व अभ्यासकांना , पर्यटन प्रेमींना आणि ईतर घटकांना एकत्रित आणण्याचे काम भविष्यात करण्यात येईल. जुन्नर बिबट सफारी, मध्यवर्ती पर्यटन सुविधा केंद्र ,पर्यटन नकाशा हा क्यू आर कोड सह आणि सर्व पर्यटन स्थळांच्या माहितीसह उपलब्ध करून देण्यात येईल. अष्टविनायक दर्शनासाठी लवकरच इलेक्ट्रिक बस व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहितीही यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी दिली .
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव आणि जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जबाबदार पर्यटन कार्यशाळा व अष्टविनायक नकाशा अनावरण समारंभ लेण्याद्री गोळेगाव येथे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आणि शुभहस्ते संपन्न झाला .यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले ,जुन्नर पंचायत समितीचे सभापती वैभव तांबे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर, जुन्नर /आंबेगाव चे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस ,गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी ,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, श्री लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे,सचिव जितेंद्र बिडवई , जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, देवस्थान ट्रस्टचे खजिनदार काशिनाथ लोखंडे ,ट्रस्टचे विश्वस्त शंकर ताम्हाणे ,मच्छिन्द्र शेटे,जयवंत डोके,प्रभाकर गडदे,भगवान हांडे जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे ,उपाध्यक्ष राधाकृष्ण गायकवाड ,खजिनदार शिरीष भोर,संस्थेचे विश्वस्त संदीप वाघोले ,जितेंद्र देशमुख,लेण्याद्री महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सुचित्रा कोकणे , शोभा माळी, नंदा मंडलिक,सारिका कोकणे अदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

या पर्यटन कार्यशाळेत कापडी पिशव्यांचे वाटप लेण्याद्री परिसरातील छोट्या दुकानदारांना करण्यात आले. आणि या माध्यमातून लेण्याद्री परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट ने पुढाकार घेतला. तसेच जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांसाठी पर्यटन संचालनालयाच्या गाईड प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षित करण्यात आलेल्या गाईडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओळख पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस ,जुन्नरचे वनाधिकारी अजित शिंदे ,जुन्नर आंबेगाव चे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी उपस्थितांना जबाबदार पर्यटना बद्दल मार्गदर्शन केले .
जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सर्व घटकांची एकत्रित बैठक तहसीलदार कार्यालय जुन्नर या ठिकाणी नियमित आयोजित केली जाईल आणि या माध्यमातून सर्व पर्यटन घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन जुन्नर आंबेगाव चे प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिले.


या कार्यशाळेच्या माध्यमातून जुन्नर पर्यटन - जबाबदार पर्यटन चळवळीला अधिक हातभार लागणार असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा पर्यटनातील जागरूक तालुका असल्याचे मत पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर यांनी व्यक्त केले.


या जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळेला प्रामुख्याने देवस्थानचे सेवक वर्ग, परिसरातील हॉटेल  आणि इतर व्यावसायिक व हारफुल वाले ,महिला बचत गट ,डोली व्यावसायिक , पर्यटन संचालनालयाने नुकतेच प्रशिक्षित केलेले गाईड आणि ग्रामस्थ गोळेगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राज्यातील या पहिल्या पर्यटन तालुक्यात, जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून, पर्यटन विकासाचे वातावरण तयार करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम घेण्यात येत असतात.स्थानिक घटकांची एकजूट जुन्नर पर्यटन मॉडेलला शाश्वत पर्यटनाकडे घेऊन जाईल असा विश्वास उपस्थित सर्व राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी व्यक्त केला. पर्यटनातुन रोजगाराच्या संधींच्या शोधात असणाऱ्या जुन्नरकरांनी या जबाबदार पर्यटन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन या निमित्ताने जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे यांनी केले.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी संदीप जी वाघोले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त शंकर ताम्हाणे यांनी केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.