वरोरा : शिक्षक हे समाजाला प्रकाश दाखवतात, शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. योग्य मार्ग दाखविणारा शिक्षक हा आधुनिक तंत्रज्ञानात मागे पडू नये. शिक्षकांनी त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देने खरे गरजेचे आहे. हे विद्यार्थी घडले तरच देशाचे भवितव्यही आपोआप घडेल. अशा विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांचा खरोखरच सन्मान होणे आवश्यकच आहे. समाजात असे शिक्षक कुठलाही गाजावाजा न करता सत्कार्य करीत असतात. आपल्याबद्दल जे चांगले असेल ते पुढे येणे गरजेचे आहे. असे व्यक्तव्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या माजी तंत्रज्ञान विभाग प्रमुख मा. डाँ. सुनिता देव यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सर्वोदय आश्रमच्या वतीने आनंद अंध विद्यालय, आनंदवन येथील कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांना कै. मामा क्षीरसागर स्मृती "आचार्य पुरस्कार" देवून गौरविण्यात आले. विनोबा भावे सर्वोदय आश्रमाच्या एका शानदार सभागृहात नागपूर विद्यापीठाच्या माजी तत्वज्ञान विभाग प्रमुख मान. डाँ. सुनीती देव यांच्या हस्ते रोख पाच हजार रूपये, शाल -श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सर्वोदय आश्रमाच्या कार्याध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी जेष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या श्रीमती लीलाताई चितळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अँड. वंदन गडकरी, व्यवस्थापकीय विश्वस्त अँड. आशुतोष धर्माधिकारी, सर्वोदय आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. पांढरी पांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
या पुरस्कारा प्रसंगी सत्कार झाल्याबद्दल मनोगत व्यक्त करतांना परमानंद तिराणिक म्हणाले दीव्यांग अंध अपंगाना अजूनही ग्रामीण भागातील त्यांच्या पालकांपर्यंत शिक्षणाबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृतीत कुठेतरी आपण कमी नाही पडतो आहोत. शासनाची उदासीनता म्हणजे आजही अनेक भागांत शाळा नाही. कला शिक्षकही नाहीत. त्यामुळे गरजूंना खरे शिक्षण देणाऱ्या संगीत, कला शिक्षकांची आज अधिक गरज आहे. ज्यांना दृष्टी आहे अशा विद्यार्थ्यांना शिकवणे सहज असते परंतु ज्यांना दृष्टीच नाही तर हे विद्यार्थी जगातील घडणाऱ्या घडामोडींवर कसे व्यक्त होणार यांना शिकविण्यासाठी तारेवरची आम्हा शिक्षकांना कसरत करावी लागते. या पुरस्कार सोहळ्यातून खऱ्या शिक्षकांचा सन्मान सर्वोदय आश्रम नागपूरचा "आचार्य पुरस्कार" हा विशेष आहे. महात्मा गांधीचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदय विचाराने काम करणारी संस्था जेव्हा माझ्या सारख्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शिक्षकाची निवड करते तेव्हा माझी जबाबदारी वाढते. प्रास्ताविक सुरेखाताई देवघरे, यांनी केले तर सुत्रसंचालन दमयंती ताईने केले, कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.