Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०७, २०२२

भल्या पहाटे खाटेवरून उठली ती; बघते तर समोर चक्क बिबट








ऊसेगाव येथील बिबट्याला पकडण्यात यश; लवकरच मोकळ्या अधिवासात सोडणार : वनाधिकारी प्रशांत खाडे यांची माहिती


जिल्ह्यातील उसेगाव येथे भगवान आवारी यांच्या घरात आज 7 एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या घुसला होता. सकाळी साडेआठ च्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आले. काही दिवस देखरेखीत ठेवून लवकरच त्याची मोकळ्या अधिवासात मुक्तता केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर वन विभागाचे विभागीय अधिकारी श्री. प्रशांत खाडे यांनी दिली.

खाडे यांनी सांगितले की, सावलीपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या उसेगाव येथे आवारी यांच्या घरी चार जण घरात झोपले होते. पहाटे लघविसाठी भगवान यांची आई सिंधुबाई उठल्या. तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. तेव्हा उठून बघितली असता सिंधूबाई यांची सून शशिकला बाई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार करीत जीव वाचविण्यासाठी घराबाहेर घाईने निघून गेली. तेव्हा बिबट असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती उपसरपंच सुनील पाल यांना दिली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सावली येथील वनरक्षकानी पाहणी केली. आज सकाळी 8 वाजता वनविभागाची टीम आणि इको प्रो चे पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या बारा मिनिटातच या बिबट्याला पकडण्यात यश आले.
यावेळी चंद्रपूर वन विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे, सावलीचे वन क्षेत्र अधिकारी वसंत कामडी, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्यासह वन विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.







The leopard entered the house around 3.30 in the morning


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.