चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी २२ एप्रिलला शहरातील पेट्रोल पंप समोर महागाई चालिसा आंदोलन करण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयभाऊ वेडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे , आमदार प्रतिभाताई धानोरकर , आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात आंदोलन होईल . आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केले आहे.
आंदोलन पहिले दिनांक : शुक्रवार , ता . २२ एप्रिल २०२२ रोजी वेळ : दुपारी ०४.०० वा . कोतपल्लीवार पेट्रोल पंप , जनता कॉलेज चौक , चंद्रपूर येथे तर दुसरे आंदोलन शुक्रवार , ता . २२ एप्रिल २०२२ रोजी वेळ : दुपारी ०५.०० वाजाता स्टेट बँकेसमोर , कस्तुरबा मार्ग , भानापेठ येथे होणार आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिली.
Inflation Chalisa agitation of city congress against central government on Friday