Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०४, २०२२

आगीचे गोळे हे चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचा अंदाज

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पडलेले आगीचे गोळे हे चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचा अंदाज अभ्यासक वर्तवित आहेत.


फेब्रुवारी 2021 मध्ये चीननं ”चँग झेंग 3 बी” या नावाचं रॉकेट प्रक्षेपित केलं होतं आणि चीनच्या याच रॉकेटचे अवशेष महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पडल्याचा अंदाज आहे. चीनच्या रॉकेटचे डेब्रीस भारतातील मध्यवर्ती राज्यांमध्ये कोसळले. या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी कुतूहल निर्माण झाले आहे.




चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात ज्या ठिकाणी हे आगीचे गोळे पडले त्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.बैलगाडीच्या चाकाच्या आकाराएवढ्या लोखंडी पट्ट्या लोकांना सापडल्या. त काहींना धातूची गोलाकार वस्तूही सापडली. लोखंडी गोलाकार वस्तू चीनच्या रॉकेटचं डेब्रीस असल्याचं समोर आलं आहे. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत चार उपग्रहाचं डेब्रीस परत येणार होतं.




चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अवकाशात प्रवाही लाल गोळे दिसल्याने हा प्रकार काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी त्यांच्या भागातील व्हीडीओ सोशल मीडिया शेयर केले आहेत. आता नासा मधील विज्ञान अभ्यासक लीना बोकील यांनी काल जे अवकाशातून पडलं ते चायनीज रॉकेट किंवा सॅटॅलाइट चा एखादा भाग असू शकतो असा दावा केला आहे.




A blazing streak of light was seen in the night sky over several parts of Maharashtra on Saturday. The streak, which appeared like a meteor shower, was actually the remnants of a Chinese rocket reentering Earth’s atmosphere, according to a US scientist.

Chinese Chang Zheng 5B rocket, which was launched in February 2021, reentered Earth’s atmosphere on Saturday and burned up in the skies over India. Most debris from the rocket will be burned up on re-entry and is highly unlikely to cause any harm.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.