Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल २४, २०२२

दारू दुकानाला विरोध करण्यासाठी घेणार जनमत चाचणी |

दाताळा मार्गावरील दारू दुकानाला विरोध करण्यासाठी जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारूबंदी समिती घेणार जनमत चाचणी



जगनाथबाबा नगरातील रामसेतूच्या पायथ्याशी मंजूर केलेले देशी दारू दुकान व बियर शॉपी रद्द करण्यासाठी  जगनाथबाबा  नगर दारूबंदी संयुक्त संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे .ही समिती आता या संदर्भात जनमत चाचणी घेणार असून, नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आज 24 एप्रिल रोजी रविवारी जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीने केले आहे.



काही दिवसांपूर्वी जगन्नाथबाबा मठा जवळ रामसेतूच्या पायथ्याशी देशदारुची भट्टी व बियर शॉपिला परवानगी देण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करीत जनतेने  हा प्रयत्न हाणून पाडला आणि दुकान सुरू झालेच नाही. 18 एप्रिलला जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीच्या नेतृत्वात  जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांच्या संयुक्त हस्तक्षराचे निवेदन दिल्यावर 20 एप्रिलला जगनाथबाबा मठात  जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संघर्ष समिती गठीत करण्यात आली.

या समितीने एल्गार पुकारला असून आदोलनाचे विविध टप्पे ठरविले आहेत. यात पत्र भेजो व जनमत चाचणी, मोर्चा व निदर्शनेचा समावेश आहे. जनमत चाचणीला लवकरच सुरवात होत असून, यासाठी समितीच्या सदस्यांनी 'डोअर टू डोअर' सम्पर्क सुरू केला आहे.यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीने केले आहे.

Chandrapur CMC Datala Road Jagannath baba Nagar 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.