Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०५, २०२२

सावधान ! अवकाशातील खगोलीय वस्तू सापडल्यास स्पर्श करू नका |

सावधान ! अवकाशातील खगोलीय वस्तू सापडल्यास स्पर्श करू नका

चंद्रपूर दि. 5 एप्रिल : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. इतर ठिकाणी अशा आणखी वस्तु आढळल्यास नागरिकांनी सदर वस्तुला स्पर्श करू नये तसेच सेल्फी घेण्याचे टाळावे. याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.



शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात आकाशातून लाल रंगाची वस्तु जमिनीवर पडताना दिसली. जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात गोलाकार रिंग आणि लोखंडी गोळे आढळले असले तरी या घटनेबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

            जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या तप्त वस्तु नक्की कशाच्या आहेत व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल. त्यासाठी प्रशासनाने इसरो आणि डीआडीओशी  संपर्क करून माहिती दिली आहे. या खगोलशास्त्रीय वस्तुंची पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम येण्याची शक्यता आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

            सुदैवाने आगीच्या तप्त गोळ्यामुळे आणि रिंग मुळे कोणतीही जिवीतहानी व वित्तहानी झाली नाही. रहिवासी भागात हे अवशेष पडले असते तर अघटीत घटना घडली असती. नागरिकांनी अशा घटनांची प्रशासनाला त्वरीत माहिती द्यावी,  असे आवाहनही त्यांनी केले.


#Chandrapur #blacksky #Geo


--------------------

संबंधित शोध

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र , ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.