टायगर ग्रुप नवेगावबांध च्या वतीने रुग्णांना फळ वाटप.
उद्या शोभा यात्रा व महाप्रसाद.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.9 एप्रिल:-
जागतिक महामारी कोरोणाच्या निर्बंधातून मुक्तता झाल्यामुळे दोन वर्षानंतर नवेगावबांध येथे राम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा होत आहे. महोत्सवासाठी संपूर्ण गावात सर्वत्र भगवे तोरण ,पताके लावण्यात आलेले आहेत.तर येथील ग्रामीण रुग्णालयात स्थानिक सामाजिक सांस्कृतिक टायगर ग्रुप च्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी नवेगावबध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाार्धन हेगडकर वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे, सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर, टायगर ग्रुपचे सुनिल डोंगरवार ,अनिल डोंगरवार ,जितेंद्र कापगते,
आशिष लंजे, सागर लांडगे, जितू बानक ,आशिष मळकाम, महेश नाकाडे, आदेश सोनवणे, विजय संग्रामे आदी मित्र परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .
पाहुण्यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांच्या हस्ते फळ वितरण करण्यात आले .
प्राचीन परंपरेनुसार गावातील प्राचीन बालाजी मंदिरात गुढीपाडव्यापासून राम नवमीपर्यंत अविरत राम नामाचा जप भजनाच्या माध्यमातून केला जात आहे. राम जन्मोत्सवाची सांगता राम नवमीला करण्यात येणार असून त्यानिमित्य गावातील सर्व भजनी मंडळी आळीपाळीने आपला योगदान येत आहेत .सध्या गावात मनरेगाची काम सुरू असल्यामुळे राम नामाच्या जपा मध्ये खंड पडू नये म्हणून ज्येष्ठ महिला मंडळी आपल्या नातवंडांना घेऊन जप करतांनी दिसत आहेत.समारोपानिमित्य दिनांक 10 एप्रिलला बाळाजी मंदिरात महाप्रसाद व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याकरिता पॅंथर ग्रुप नवेगावबांधचे पदाधिकारी , कार्यकर्ते मित्र मंडळी व गावकरी प्रयत्नरत आहेत .