Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०६, २०२२

ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा.नवेगावबांध ग्रामपंचायत ने केला होता पाठपुरावा.

उद्यापासून रुग्णांच्या सेवेत.







संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.6 एप्रिल:-
येथील  ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा परिसरातील रुग्णांना मिळणार आहे. परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे खुप दिवसांपासुन डिजिटल एक्सरे मशिनची मागणी ग्रामपंचायत ने लावून धरली होती. गेल्या काही महिन्यांपासून या मशीन साठी आरोग्य विभागाकडे ग्रामपंचायत मे पाठपुरावा केला होता. आज दिनांक ६ एप्रिल ला ही मशीन ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे या आदिवासी, ग्रामीण,दुर्गम  परिसरातील रुग्णांना या मशीनचा लाभ होणार आहे.
ही डिजिटल एक्स-रे मशीन पोर्टेबल असल्यामुळे,बेड साइडवर वापरण्यास सोपे आहे. कुठेही हलविता येत असल्यामुळे, रुग्णांची फारच सोय होणार आहे. उद्यापासूनच ही डिजिटल एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत येणार आहे.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र टंडन यांनी सांगितले.
ग्रामपंचायत ने गेल्या काही महिन्यापासून हे डिजिटल एक्स-रे मशीन ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला आज ही मशीन रुग्णालयाला प्राप्त झाली त्यामुळे परिसर रुग्णांना याचा नक्कीच लाभ होईल. नाहीतर नुसते एक्स-रे साठी साकोली, गोंदिया, वडसा या ठिकाणी खाजगी रुग्णालयात परिसरातील रुग्णांना जावे लागत होते. यात आता रुग्णांचा पैसा व वेळ वाचेल. त्यामुळे परिसरातील रुग्णांची खासच सोय झाली आहे.परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
- सरपंच अनिरुद्ध शहारे,
 ग्रामपंचायत नवेगावबांध.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.