Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०८, २०२२

तिने हॉटेल व्यवसायातून साधला विकास | मुस्लिम समाजातील ह्या कर्तबगारी महीलेचे प्रेरणादायी कार्य






वेलतूर बातमीदार /शरद शहारे
समाजात घराबाहेर पडायलाही बंदी असलेल्या फातमा हबीबखा पठाण नामक मुस्लिम महीलेने वैधव्यानंतर पतीचा वेलतूरातील टपरीवजा हाटेल चालवत आपल्या मुलींना उच्च शिक्षीत करूण एक प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला आहे.
पतीच्या अल्पशा बिमारीणे अकस्मात आठदहा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर खचून न जाता तिने त्याच हॉटेलच्या भरोशावर उभ केलेल कुटूंब व मुलींचे शिक्षण त्यांचे सामाजिक चाली रिती पाळत झालेले लग्न समाजात एक आदर्श उदाहरण ठरत आहेत.
मुस्लिम समाजातील कर्तबगार महीला म्हणून आता तिच्या कडे बघीतले जात असुन तिचे कार्य महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला बळ प्रधान करणारे ठरत आहे. तिला शबुकता पठाण व गझाला पठाण ह्या दोन मुलीच असुन दोन्ही मुली सायन्स च्या पदवीधर आहेत हे विशेष. पतीनिधनानंतर झालेल्या आर्थिक व सामाजिक होरपळीतून स्वताः ला सावरत त्यांनी पतीचा हॉटेल व्यवसाय जवळ करत त्यांनी साधलेले हे यश कौतुकास्पद आहे.

शिक्षण विषयक व आर्थिक समाजजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. ही लोकचळवळ व्हावी . या संदर्भातील शासनाच्या विविध योजना आहेत त्या तळागाळातील महिलांपर्यत पोहचाव्या. व महिलांनी त्यासाठी आग्रही बनावे.
- अश्विनी तुकाराम शिवणकर
सभापती प.स.कुही


महिलांनी माघे राहून चालनार नाही. कुटुंबाची खरी शिल्पकार तिच आहे. तीला अधीक कनखर होऊन महीला सक्षमीकरणाच्या चळवळीला पुढे नेण्याची गरज आहे.
- कविता ज्ञानेश्वर साखरवाडे
सदस्य, जि.प.नागपूर


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.