महाऔष्णिक विद्युत केंद्रातून जाणाऱ्या राखेची ईरई नदीच्या पात्रात गळती; पाणी दूषित होत असल्याचा व्हिडिओ वायरल
इरई नदी हि चंद्रपूर शहराजवळून सुमारे सात किलोमीटर समांतर वाहते. या नदीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असतानाच आज १ मार्च रोजी महाऔष्णिक वीज केंद्रातून राख वाहून नेणाऱ्या ओल्या राख वाहक पाईपलाईनला गळती झाली. त्यामुळे इरइ नदीतील पात्रातील पाणी दूषित झाले आहे. याचा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला कोल वॉशरीजमधून नियमित कोळसा पुरवठा केला जातो. वीजनिर्मितीनंतर केंद्रातून निघणारी राख शेजारच्या परिसरात साठविण्यात येते. ती वाहून नेण्यासाठी इरई नदीच्या पात्रावरून राख वाहक पाईप लाईन आहे. मात्र, पाईपलाईनला गळती झाल्याने पाणी दूषित झाले आहे.
See how wet ash carrier pipeline of CSTPS are @connectMSPGCL leakage this evening.due to this million liters ash mixed in IRAI river. @mpcb_official @AUThackeray pic.twitter.com/8fBJEHZDiR
— Arun Sahay (@arsh_ved) March 1, 2022
Ashes | Chandrapur Thermal Power | Erai River | viral Video | state government | pipeline | Coal Washers |