जगातील दोन टक्के टॉप शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट डॉ. संजय ढोबळे तरुण संशोधकांसाठी एक प्रेरणास्त्रोत
ग्रामायण सृजन गाथा
नागपूर ४ फेब्रुवारी २०२२
ग्रामायण सृजनगाथामध्ये नागपूर विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजय ढोबळे यांची मुलाखत घेण्यात आली. डॉ. संजय ढोबळे हे मूळ मध्य प्रदेशातील मोहगाव (हावेडी) सौंसर येथील रहिवासी. त्यांचे १२वी पर्यंतचे शिक्षण तिथेच झाले पुढे B.Sc. करण्याकरिता ते छिंदवाडा येथे गेले. नंतर १९८८ मध्ये त्यांनी राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर येथून फिजिक्स या विषयांमध्ये M.Sc केले. त्यांचे आई- वडिल शिक्षक व परिवाराचा मूळ व्यवसाय शेती आहे. सन् १९९२ मध्ये त्यांना नागपूर विद्यापीठाने सॉलिड स्टेट फिजिक्स मध्ये P. hd. प्रदान केली. २००८ पर्यंत त्यांनी कमला नेहरू महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर २००९ पासुन ते नागपूर विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत.
सुरुवातीचा प्रवास त्यांचा खडतर राहिला, ते म्हणतात वाहन घेणे शक्य नसल्यामुळे त्यांना D.D. College मध्येच शिक्षण घ्यावे लागले. परंतु त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती व प्रबल इच्छाशक्ति ने आज ते गगन भरारी घेत आहेत. जगातील टॉप 2% शास्त्रज्ञांच्या यादीत ते आहेत. ते आजही १८ तास रोज काम करतात.
त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा जवळपास ३०वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या संशोधन कारकिर्दीत, ते सॉलिड स्टेट लाइटिंग नॅनोमटेरिअल्सचे संश्लेषण आणि वैशिष्ट्यीकरण तसेच थर्मोल्युमिनेसन्स, मेकॅनोल्युमिनेसेन्स आणि लायोल्युमिनेसेन्स तंत्रांचा वापर करून रेडिएशन डोसमेट्री फॉस्फरच्या विकासामध्ये गुंतलेले आहेत. डॉ. ढोबळे यांनी सॉलिड-स्टेट लाइटिंग, एलईडी, रेडिएशन डॉसमेट्री आणि लेझर मटेरिअल्स या विषयावरील पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये ५६५ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि त्यांच्या नावावर एक आंतरराष्ट्रीय पेटंट आहे. त्यांनी ४४ पुस्तके/ प्रकरणे लिहिली आहेत. त्यांच्या १६ पेटेंट ला मान्यता मिळाली आहे त्याच्याकडे स्कोपसवर ३०आणि ५७७२ उद्धरणांचा एच-इंडेक्स आहे.त्यांनी ६६ विध्यार्थ्यांना P.hd. साठी गाईडन्स दिला आहे. त्यांचे विद्यार्थी परदेशात सुध्दा संशोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी इटली, ईजिप्त, इंग्लंड अश्या अनेक देशांना भेटी दिल्या त्यांनी दक्षिण आफ्रिकेत १ महिना मार्गदर्शन केले . त्यांना व्हीनस इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने चेन्नई येथे सॉलिड स्टेट फिजिक्समधील उत्कृष्ट संशोधन योगदानाबद्दल उत्कृष्ट वैज्ञानिक - 2015 पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांना प्रगत साहित्य वैज्ञानिक पत्र पुरस्कार-2011 मिळाला आहे.
त्यांनी “सेंद्रिय प्रकाश उत्सर्जक डायोडची तत्त्वे आणि अनुप्रयोग”, “नॅनोमटेरिअल्स फॉर ग्रीन एनर्जी”, “स्पेक्ट्रोस्कोपी ऑफ लॅन्थानाइड डोपेड ऑक्साईड मटेरियल” या विषयावर एक एल्सेव्हियर पुस्तक देखील लिहिले. सत्र 2017-2018 मध्ये स्कोपस रिसर्च डेटाबेसमध्ये अनुक्रमित केलेल्या शोधनिबंधांच्या आधारे भौतिकशास्त्रातील भारतातील पहिल्या दहा संशोधकांसाठी, नवी दिल्ली येथे प्राप्त झालेल्या करिअर 360 द्वारे त्यांना भारताचा सर्वोच्च संकाय संशोधन पुरस्कार-2018 देखील प्राप्त झाला आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना व संजयजींचा परिचय सौ. सुरभी धोंगडी यांनी केली. आभार प्रदर्शन श्री किशोर केळापुरे यांनी केले.
Dr. Sanjay Dhoble