Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १०, २०२२

समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून तेली बांधवानी एकत्र यावे : प्रा. सूर्यकांत खनके यांचे आवाहन. #telisamaj

समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून तेली बांधवानी एकत्र यावे : प्रा. सूर्यकांत खनके यांचे आवाहन



चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेली समाज बांधव आहेत. परंतु मागील तीन दशकापासून जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात तेली समाज बांधवाला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आता समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तेली बांधवानी एकत्र येऊन सक्रिय राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन तेली समाजाचे जेष्ठ नेते प्रा. सूर्यकांत खनके यांनी केले.



आज तेली समाज बांधवानी आयोजित केलेल्या चिंतन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी समाज बांधव प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, अजय वैरागडे, प्रा. बेले, प्रा. वरंभे गोविल मेहरकुरे, शैलेश जुमडे, निलेश बेलखंडे, नितेश जुमडे, शेखर वाढई, जितू इटनकर, राजेंद्र रघाताटे, रवी लोणकर, विनोद कावडे, अनिल आंबोरकर यांची उपस्थिती होती.

समाजाचा विकास हाच तेली समाज बांधवांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजेत. समाज बांधवांनी एकमेकासाठी तेली समाजाची ताकत उभी केली पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन प्रकाश देवतळे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले,

राजकारणामध्ये तेली समाजाने तेली समाजालाच पाठिंबा दिला पाहिजे, तेव्हाच राजकारण तेली समाज मोठा होऊ शकतो. आजही संपूर्ण तेली समाज बांधवांचे एकत्रीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गोविल मेहरकुरे यांनी केले. यासह अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.