Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

२५० मेगावॅट सौर प्रकल्पासाठी महानिर्मितीतर्फे वीज खरेदी करार | #Maharashtra @Mahagenco

दोंडाईचा, जि. धुळे येथे एकाच ठिकाणी उभारण्यात येत असलेला राज्यातील सर्वात जास्त क्षमतेच्या २५० मेगावॅट सौर प्रकल्पासाठी महानिर्मितीतर्फे वीज खरेदी करार 



मुंबई : -अपारंपारिक ऊर्जास्त्रोत्तांच्या क्षमतेत वाढ करण्याच्या राज्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत महानिर्मितीच्या दोंडाईचाजि. धुळे येथील २५० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठीचा वीज खरेदी करार आज १४ जानेवारी २०२२ रोजी महानिर्मिती व मे. टाटा पॉवर सौर्य लिमिटेड या दोहोंमध्ये मुख्यालयमुंबई येथे संपन्न झाला. सदर करारांवर प्रकल्प विकासक या नात्याने महानिर्मितीचे वतीने सुनील इंगळे,मुख्य अभियंता (सौर) यांनी तर मे. टी.पी.सौर्य लिमिटेडचे वतीने   राकेश सिंग ,चीफ बिझिनेस डेव्हलपमेंट यांनी स्वाक्षरी केली.  


या प्रसंगी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारेसंचालक (प्रकल्प)  व्ही. थांगपंडीयनसंचालक (संचलन)  चंद्रकांत थोटवेसंचालक (माईनिंग) पुरुषोत्तम जाधवसंचालक (वित्त) बाळासाहेब थिटेसंचालक (मा.सं) मानवेंद्र रामटेके तसेच  कार्यकारी संचालक (सौरअपारंपारिक ऊर्जा (प्रकल्प) आणि सां.नि. व सु.) राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महानिर्मितीतर्फे विकसित करण्यात येत असलेले सदर सौर पार्क हे सुमारे ५०४.७१ हेक्टर क्षेत्रफळाचे असून केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत समाविष्ट आहे.  तब्बल २५० मेगावॅट क्षमतेच्या या मोठ्या सौर प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण न्यूनतम राखण्यात यश येणार असून महावितरणला अपारंपारिक ऊर्जेचे अनिवार्य प्रमाण (RPO) राखण्यास देखील मदत होणार आहे.  या सौर प्रकल्पातून महानिर्मितीच्या माध्यमातून महावितरणला रु. २.५८ प्रति युनिट इतक्या रास्त दरात वीज प्राप्त होणार असल्याने वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे.  या प्रकल्पातून प्रतिवर्षी सुमारे ५.६७ दशलक्ष युनिट्स एवढी वीजनिर्मिती अपेक्षित आहे.

या मोठ्या प्रकल्पामुळे दोंडाईचा परिसरातील स्थानिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार उपलब्ध होणार असून परिसराचा कायापालट होण्यास त्यायोगे मदत होणार आहे. 
 
महानिर्मिती तर्फे महाराष्ट्र हरित करण्याकरिता मोठे योगदान देण्यात येत आहे. या प्रकल्पाबरोबरचमहानिर्मितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सौर उर्जा उत्पादन करण्यासाठी मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे. यामुळे,  आजपर्यंत २०७ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत.

भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे निर्देश आणि उद्दिष्टांच्या अनुषंगाने पुढील क्षमता वाढीसाठी महानिर्मिती  मार्फत  प्रयत्न करण्यात येत आहेत. आजमितीस एकूण २७९५  मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प अंमलबजावणीची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच महानिर्मिती मार्फत ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याकरिता आनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत.

Signing of Power Purchase Agreement (PPA) for 250 MW Dondaicha Solar Park by Mahagenco the largest solar project at single location in Maharashtra
 
Power Purchase Agreement (PPA) is signed between MAHAGENCO and M/s. T.P. Saurya Ltd. For 250 MW Capacity Dondaicha Solar Park at Head Office, Mumbai.
 
Brief of 250 MW Dondaicha Solar Park.
•             MAHAGENCO is developing 250 MW Dondaicha Solar Park on 504.71 Ha land at Dist. Dhule under Ministry of New and Renewable Energy's (Gol) Solar Park Scheme under the guidance of Hon. Energy Minister Dr. Nitin Raut.
 
•             The project will provide a huge impetus to solar energy generation in the State of Maharashtra and will also enable the State to fulfill the RPO, reduce its carbon footprint by avoiding emission equivalent to the solar park's installed capacity and generation. Further, the State will also avoid procuring expensive fossil fuel to power conventional power plants.
•             Considering installed capacity of 250 MW, it will reduce the annual carbon emission by approx. 5, 86,671 Tonnes and reduce annual coal consumption of approx. 4, 45,825 Tonnes.
•             MAHAGENCO is the Solar Power Park Developer (SPPD) and is entrusted with responsibility of developing essential solar park facilities as per the solar park scheme.
•             The expected annual generation from this project is approx. 56,79,30,000 kWh.
•             Letter of Award is placed on M/s TP Saurya Ltd. on dated 17.12.2021. MAHAGENCO will supply power to MSEDCL @ Rs. 2.58/kWh, which is going to give relief to power consumers.
•             The project will be commissioned within 15 Months from signing of PPA i.e. by April-2023 and the project life will be 25 Years from the date of commissioning.
The PPA was signed by  Sunil Ingle ,Chief Engineer (Solar) and Rakesh Singh , Chief Business Development ,  M/s T.P.Saurya in presence of Hon .CMD, Mahagenco  Sanjay Khandare, Director (Operations)  Chandrakant Thotwe, Director (Mining)  Purushottam Jadhav, Director (Finance)  Balasaheb Thite, Director (H.R) Manvendra Ramteke and Executive Director ( Solar) Rajesh Patil .
Further, the project will enable local area development and also generate employment opportunities to the local population.
•             MSETCL is developing 220/33kv Pooling Substation & 220kV LILO transmission line for 250 MW capacity on behalf of MAHAGENCO on depository basis.
Mahagenco is contributing towards Green Maharashtra with 207 megawatt solar projects are commissioned and working satisfactorily. In line with GoI and GoM directives and targets further capacity addition of 2795 MW are under various stages of implementation. Mahagenco is also developing Green Hydrogen Projects for which work is in progress.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.