जुन्नर (आनंद कांबळे )
मागील २२ वर्षापुर्वी स्थापन झालेल्या व अद्यापही कार्यान्वित होऊ न शकलेल्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संसंस्थेसाठी शासनाने तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी कुकडेश्वर हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंदे यांनी प्रजासत्ताक दिनी सुरू केलेले प्राणांतिक उपोषण दुसऱ्या दिवशीदेखील सुरु राहिले.
उपोषण स्थळी आमदार अतुल बेनके,जि प सदस्य देवराम लांडे,सर्वपक्षीय पदाधिकारी आदिवासी महामंडळ ,घोडेगावप्रकल्प अधिकारी यांनी भेट देऊन चर्चा केली.परंतु शासनाने निधी उपलब्ध केल्या संदर्भात लेखी पत्र दिल्याशीवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा करण्याचा इशारा काळू शेळकंदे यांनी दिला आहे.
कारखान्याचे संचालक शिवाजी डोंगरे,नाथा शिंगाडे , गेणभाऊ वाजे, हरिभाऊ तळपे, आदिवासी विकास परिषदेचे कार्यवाह गोविंद साबळे ,किसान सभेचे विश्वनाथ निगळे, संजय साबळे,रामचंद्र शेळकंदे,चंद्रकांत तळपे,ज्ञानेश्वर लांडे, बुधाजी तळपे, बापूसाहेब मडके, देवराम नांगरे, बाबुराव मडके, सखाराम डावखर,रविंद्र मिंडे, दादा विरणक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कारखाना चालविण्याचे साठी कच्चा माल हिरडा आदिवासी भागात उपलब्ध आहे.कारखान्याची उभारनी प्रगती पथावर आहे,यंत्रसामुग्री आहे परंतु कारखाना कार्यान्वित होण्यासाठी दोन ते तीन कोटी निधीची आवश्यकता आहे. शासन दरबारी अनेक बैठका निर्णय झाले परंतु सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सातत्याने बेदखल केले असल्याचा आरोप अध्यक्ष काळू शेळकंदे यांनी केला