शहरातील डॉक्टरांनी केली जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती
चंद्रपूर, ता. १ : शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि पालकांमधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी शहरातील डॉक्टरांनी जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती केली.
ही लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शासकीय आणि खासगी शाळांत पालकसभा घेण्यात आली. मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमएचे सचिव डॉ. अनुप पालीवाल, आयएपी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. अपर्णा अंदनकर, आयएपी संघटनेच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. इर्शाद अली शिवजी, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. सुवर्णा सोंडावले, डॉ.पीयूष मुत्यालवार, डॉ. राम भारत डॉ.अंकुश खिचडे यांनी बैठकांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
#Chandrapur #चंद्रपूर